Take a fresh look at your lifestyle.

ipl auction 2023 : आगामी आयपीएल स्पर्धेसाठी आज होणार लिलाव; जाणून घ्या कोणत्या संघाकडे किती स्लॉट व किती रक्कम शिल्लक

0

क्रिकेट जगतातील सर्वात एन्टरटेनिंग क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (indian premier league) 2023 चा बिगुल आजपासून (२३ डिसेंबर) खऱ्या अर्थाने वाजणार आहे. कोचीमध्ये आज पुढील हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे. यावेळी मिनी लिलावासाठी अंतिम 405 खेळाडू निवडले गेले असून या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी विविध संघ मोठा पैसा खर्च करणार आहेत.

या 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू आहेत. या 132 परदेशी खेळाडूंपैकी 4 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. तर एकूण 119 कॅप्ड आणि 282 अनकॅप्ड खेळाडू लिलावात सहभागी होतील. सर्व संघ एकूण 87 खेळाडू खरेदी करू शकतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू असतील.

आयपीएल लिलाव कुठे पाहता येणार? (Where to watch IPL auction)

कोची येथे दुपारी 2.30 वाजता आयपीएलचा लिलाव सुरू असून हा लिलाव भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. जिओ सिनेमा अँप आणि त्याच्या वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.

लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती स्लॉट व रक्कम शिल्लक
सनरायझर्स हैदराबाद – 42.25 कोटी (13 स्लॉट)
पंजाब किंग्स –32.2 कोटी (9 स्लॉट)
लखनौ सुपर जायंट्स – 23.35 कोटी (10 स्लॉट)
मुंबई इंडियन्स – 20.55 कोटी (9 स्लॉट)
चेन्नई सुपर किंग्स – 20.45 कोटी (7 स्लॉट)
दिल्ली कॅपिटल्स – 19.45 कोटी (5 स्लॉट)
गुजरात टायटन्स – 19.25 कोटी (7 स्लॉट)
राजस्थान रॉयल्स – 13.2 कोटी (9 स्लॉट)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 8.75 कोटी (7 स्लॉट)
कोलकाता नाइट रायडर्स – 7.05 कोटी (11 स्लॉट)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues