Take a fresh look at your lifestyle.

IPL 2023 Schedule : क्रीडाप्रेमींसाठी खुशखबर : आयपीएल 2023 चे वेळापत्रक आले; पहिल्याच सामन्यात गुरू शिष्य भिडणार

0

IPL 2023 Schedule : आयपीएल 2023 अर्थात 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून आयपीएलचा हा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार असून हंगामातील लीगचा शेवटचा सामना 21 मे ला होणार आहे. या 16 हंगामातील पहिला सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यामुळे यंदाच्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात गुरू शिष्य भिडणार असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलचे 10 संघ लीग स्टेजमध्ये 70 सामने खेळणार आहे. आयपीएलचा हा कुंभमेळा जवळपास दीड महिना चालणार आहे. या वर्षी लीगमध्ये 10 संघांपैकी प्रत्येक संघ घराबाहेर आणि घरामध्ये प्रत्येकी 7 सामने खेळतील.

यंदाच्या सत्रात कसे असतील ग्रुप्स :

IPL 2023 ग्रुप A : मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

IPL 2023 ग्रुप B : चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स

यंदाच्या सत्रात कसे आहेत सुरुवातीचे सामने :

31 मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स

1 एप्रिल – पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स

2 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स

2 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

(आणखी बातमी लवकरच अपडेट होईल)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues