Take a fresh look at your lifestyle.

एका यंत्रणा बसवा अन् मोफत वीज मिळवा; पण कसे? वाचा!

0

महागाई आणि त्यातच वाढलेले विजेचे दर पाहता सामान्य नागरिक चांगलाच अडचणीत सापडला आहे. वीज बिल कमी यावे यासाठी वीज बचत करण्यावर भर देतच असतो. मात्र एक अशी यंत्रणा आहे, की ज्या माध्यमातून तुम्हाला मोफत वीज मिळू शकते. पण कशी? याबाबत अधिक जाणून घेऊयात…

हो, सौर ऊर्जेच्या वापरातून वीजनिर्मिती करून तुम्ही मोफत वीज वापरू शकता. त्यासाठी सौर ऊर्जा निर्मिती करणारी यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सरकार यासाठी अनुदान देखील देतं.

सरकार सौर ऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. तसेच जर तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करू इच्छित असाल, तर तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत असलेल्या ठिकाणी सौर पॅनेल्स इन्स्टॉल करून घ्या. या माध्यमातून तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास तुम्ही ही वीज सरकारला विकू शकता.

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही सोलर पॅनेलचं आयुष्यमान 25 वर्ष इतकं असतं. यासाठी मेटेंनन्सचा विशेष खर्च येत नाही. मात्र दर 10 वर्षांनंतर आपणांस बॅटरी बदलणं आवश्यक असतं. त्यासाठी 20 पर्यंत खर्च येतो. जर तुमच्यकडे ज्यादा वीजनिर्मिती झाली तर तुम्ही सरकारी वीज कंपनीस ती विक्री करू शकता. यासाठी तुम्ही रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट ऑथोरिटीशी संपर्क साधू शकता.

अनुदान किती, खर्च किती? : या सोलर प्लॅंटसाठी केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून 30 टक्के अनुदान देण्यात येते. तुम्ही स्वखर्चाने प्लॅंट उभारणार असाल, तर सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. हा प्रकल्प सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर 60 ते 70 हजार रुपयांत सुरू करता येतो. याचे अनुदान राज्यांनुसार वेगळे आहे.

वीज आणि विकण्याचे गणित : जर तुम्ही 2 किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट बसवला, तर 10 तासांच्या सूर्यप्रकाशातून किमान 10 युनिटची वीजनिर्मिती होते. याचा विचार करता एका महिन्यात सुमारे 300 युनिट वीज तयार होईल. जर तुमच्या घरगुती वीजेचा वापर 100 युनिट्स असेल, तर उर्वरित वीज तुम्ही सरकारला विकू शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.