Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात आहे देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन केंद्र

0

देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती केंद्र पुण्यात सुरू करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने राज्यातील शेतकरी आणि शेतीकडे वाळलेले उदयन्मुख शेतकरी तसेच निर्यातदार यांना नक्कीच दिशा मिळणार आहे.

हे केंद्र एमसीसीआयएच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील निर्यातदारांसाठी वन स्टॉप शॉप या धर्तीवर काम करत आहे.

जे नवोदित निर्यातदार निर्यातीच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे केंद्र विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे. जसे की, कीडनाशकांचे उर्वरित अंशाचे व्यवस्थापन, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, आयातदार देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालासाठी गुणवत्तेचे कोणते निकष लावतात. त्याची तपशीलवार माहिती दिली जाईल.

काढणीपश्‍चात असणारे तंत्रज्ञान, निर्यातक्षम फळबागांचे व्यवस्थापन, काढणी पद्धती, निर्यात केल्या जाणाऱ्या मालाची गुणवत्तेची नियमावली, पॅकेजिंग, विविध देशांचे हवाई किंवा सागरीमार्गे शेतीमाल निर्यात पाठवण्याचे निकष, हरितगृहातील उत्पादन इत्यादी निर्याती संबंधीच्या बाबींवर या निर्यात केंद्रातून सखोल मार्गदर्शन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.