Take a fresh look at your lifestyle.

India T20 & ODI squad : आगामी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर; अनेक दिग्गज खेळाडूंचे संघात पुनरागमन

0

भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी देखील टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने हे तीन संघ शुक्रवारी उशिरा जाहीर केले असून ज्यामध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले, तर काही युवा खेळाडूंना वगळण्यात आले आहे..

काय आहे न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India T20 & ODI squad) मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर जाणून घेऊया सविस्तर….

न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ (India’s squad for NZ ODIs) –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक

न्यूझीलंडविरोधात टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – India’s squad for NZ T20Is:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड संघातील वनडे मालिकेत तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेला 18 जानेवारीपासून होईल. तसेच या मालिकेत संघाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेतील कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues