Take a fresh look at your lifestyle.

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची जोरदार तयारी; भारतीय क्रिकेट संघाचे पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर

0

सध्या भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. कारण तीन एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये बांगलादेशने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

यानंतर लागिचच बीसीसीआयनं(BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी केले आहे. जानेवारी ते मार्च 2023पर्यंत भारतीय संघ मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन हात करणार असून सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.

कसे असेल भारताचे पुढील 3 महिन्याचे वेळापत्रक –

भारत विरुद्ध श्रीलंका मालिका (2023) :-

सामना – तारीख – ठिकाण
पहिला टी-20 सामना – 03 जानेवारी 2023 – मुंबई
दुसरा टी-20 सामना – 05 जानेवारी 2023 – पुणे
तिसरा टी-20 सामना – 07 जानेवारी 2023 – राजकोट
पहिला ODI सामना – 10 जानेवारी 2023 – गुवाहाटी
दुसरा ODI सामना – 12 जानेवारी 2023 – कोलकाता
तिसरा ODI सामना – 15 जानेवारी 2023 – तिरुअनंतपुरम

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका (2023)

सामना – तारीख – ठिकाण
पहिला ODI सामना – 18 जानेवारी 2023 – हैदराबाद
दुसरा ODI सामना – 21 जानेवारी 2023 – रायपूर
तिसरा ODI सामना – 24 जानेवारी 2023 – इंदूर
पहिला टी-20 सामना – 27 जानेवारी 2023 – रांची
दुसरा टी-20 सामना – 29 जानेवारी 2023 – लखनौ
तिसरा टी-20 सामना – 01 फेब्रुवारी 2023 – अहमदाबाद

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका (2023)

सामना – तारीख – ठिकाण
पहिला कसोटी सामना – 9-13 फेब्रुवारी 2023 – नागपूर
दुसरा कसोटी सामना – 17-21 फेब्रुवारी 2023 – दिल्ली
तिसरा कसोटी सामना – 1-5 मार्च 2023 – धर्माशाला
चौथा कसोटी सामना – 9-13 मार्च 2023 – अहमदाबाद
पहिला ODI सामना – 17 मार्च 2023 – मुंबई
दुसरा ODI सामना – 19 मार्च 2023 – विशाखापट्टम
तिसरा ODI सामना – 22 मार्च 2023 – चेन्नई

हेही वाचा : बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 4 कारणे, कोण आहे व्हिलन?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues