Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा श्रीलंकेवर विजय, सूर्यकुमार यादवचे शतक

0

IND vs SL भारत विरुद्ध श्रीलंका तीसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात भारतीय संघानं 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं आपल्या खिशात घातलीय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत विजयश्री खेचून आणलाय.

IND vs SL भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यामध्ये संघानं 229 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. त्यानंतर श्रीलंकन संघानं चांगली सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं मात्र पुढे ते कायम ठेवता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना 50 धावांच्या आतचं दोन झटके दिले. 44 धावांवर अक्षर पटेलने पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शदीपनं सहाव्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. पुढे 51 धावांवर हार्दिक पंड्यानं तीसरा बळी घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाची अवस्था 51 धावांवर 3 बाद अशी झाल्याची पाहायला मिळाली.

IND vs SL पुढे श्रीलंकन खेळाडू धनंजया डी सिल्वा आणि चारिथ असलंका यांच्याकडून डाव संभाळून घेण्याची अपेक्षा वाटत असतानाच युजवेंद्र चहलनं या दोघांना माघारी पाठवलं. 12 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारतीय संघानं तगडं आव्हान दिलेलं होतं. पण मैदानावर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका होता. दसुन एकटा सामना जिंकून देऊ शकतो याची भारतीय गोलंदाजांना कल्पना होतीच. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने विकेट घेण्यास सुरुवात केली आणि तेथेच लंकेचा पराभव निश्चित झाला.

IND vs SL श्रीलंकेचा डाव 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अर्शदीपनं सर्वाधिक 3, हार्दिक पंड्या, उमरान मलिक, चहल यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

IND vs SL सूर्यकुमार यादवने फक्त 51 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 219.61 इतका होती. तर अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजीचा विचार केल्यास सर्वात कमी इकॉनमी होती ती 8.80 इतकी. पाच पैकी तिघा गोलंदाजांना 10 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा काढल्या.

महत्वाच्या बातम्या : शिक्षण, आरोग्य ते शेतीपर्यंत… भारतीय क्षेत्रांवर AI चा काय परिणाम झाला, 2023 मध्ये काय आहे व्हिजन

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues