Take a fresh look at your lifestyle.

IND vs BAN Highlights : भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका! कर्णधार रोहितसह 3 खेळाडू शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

0

IND vs BAN Highlights भारत विरुद्ध बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या क्षणी पराभव पत्करावा लागला आणि यासोबतच भारताला बांगलादेश मालिकाही गमवावी लागली. दुखापतग्रस्त रोहित शर्मा मैदानात आल्याने भारत हा सामना सहज जिंकेल अस्से वाटत होते, पण तसे काही घडले नाही. भारताला अखेर 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आणि या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला.

IND vs BAN Highlights या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी आपले गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अखेर अपयशी ठरला.

हेही वाचा : बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 4 कारणे, कोण आहे व्हिलन?

IND vs BAN Highlights बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान युवा गोलंदाज दीपक चहर आणि युवा खेळाडू कुलदीप सेन दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

IND vs BAN Highlights दरम्यान, बांगलादेशविरुद्धची या एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघाला लागिचच कसोटी मालिका आहे.. या मालिके मध्ये रोहित शर्मा खेळतो कि नाही यांचावर आता प्रश्न चिन्ह आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues