Take a fresh look at your lifestyle.

कृषी क्षेत्रात अतुलनीय काम तसेच बीजमाता; अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री राहीबाई पोपेरे

0

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी राहीबाई पोपेरे.तसेच त्या पारंपारिक बियाण्यांच्या वानांच्या संरक्षक-संवर्धक देखील आहेत. भारत सरकारने त्यांना देशी वाणांच्या बियाण्यांची संवर्धन केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिला होता.

राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाही. राहीबाई यांनी ज्या गावठी बियाण्याचे संवर्धन केले आहे, ते मूळ स्वरूपात आहे व त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते. राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी मिळून बचत गट बनवला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.

अशी आहे राहीबाईंची सीड बँक :

राही बाईंच्या सीड बँक मध्ये आज 52 पिकांचे 114 वाणआहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. BBC ने शंभर प्रभावशाली महिलांमध्ये राहीबाई यांचा समावेश केलेला आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे.
BAIF संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कुंभाळणे गावात सीडबँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतय. याचा परिणाम म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यासह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.

राहीबाई पोपेरे यांना मिळालेले विविध पुरस्कार :
देशी बियाण्यांच्या वाणांचे संवर्धन केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिला. हा पुरस्कार त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन 2018 मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. (संदर्भ : द फोकस इंडिया)

Leave A Reply

Your email address will not be published.