Take a fresh look at your lifestyle.

सेंद्रिय पशुपालनाकरीता महत्त्वाच्या बाबी…

0

1) जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापर करावा.
2) जनावरांच्या गरजेनुसार गोठ्यामध्ये भरपूर जागा व पूरक ताजी हवा तसेच नैसर्गिक प्रकाश मिळावा.
3) गोठ्यातील शेण व गोमूत्राचा वापर सकस चाऱ्याच्या वैरणी तयार करण्यासाठी करावा.
4) चारा पिकासाठी केमिकल खते, कीटकनाशके,बुरशीनाशके,तननाशके वापरलेली नसावीत त्यासाठी दशपर्णी अर्क, निम अर्क, स्लरी, जिवाणू खत तसेच गांडूळ खत वापरावे.
5) जनावरांना देण्यात येणारा चारा व खाद्य हे सेंद्रिय शेतीमध्ये पिकलेले असावे.
6) जनावरांना चोवीस तास पुरेल एवढ्या स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची सोय केलेली असावी.
7) भिजलेला, सडलेला, काळा पडलेला, रोग युक्त चारा जनावरांना देणे टाळावे.


8) जनावरांच्या खाद्यामध्ये शेंगदाणा पेंड, जवस पेंड सरकी पेंड, मका भरडा,गहू भुसा इत्यादी द्यावे.
9) जनावरांना चाऱ्यासोबत दररोज लाळ तयार होण्यासाठी मीठ, पचणासाठी खा.सोडा व कॅल्शियमसाठी काळा गूळ द्यावा.
10) जनावरांचे प्रजनन हे चांगल्या वंशावळीच्या वळूकडूनच नैसर्गिक पद्धतीने करावे.
11)आजारी जनावरांना पारंपारिक पद्धतीने किंवा आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक पद्धतीने औषध उपचार करावा.
12) जनावरे आजारी पडणार नाही याची जास्त दक्षता घ्यावी कारण आजारी जनावर पूर्ववत करण्यासाठी जास्त वेळ जातो.
13) जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा त्यासाठी चुन्याच्या निवळीचा वापर करावा.
14) जनावरांना रोग प्रतिबंधक लसी द्याव्यात सेंद्रिय पशुपालनात लसीकरण पद्धती वापरता येते.
15) जनावरांचे ऊन,वारा,पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीपासून व कर्कश आवाजापासून संरक्षण करावे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक :
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.