Take a fresh look at your lifestyle.

बोरवेल घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

0

पावसाचे कमी-जास्त होणारे प्रमाण तसेच पाण्याची वाढती पाहता सध्या जमिनीच्या वरच्या थरांमधील पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. अशाने जमिनीच्या कातळाच्या थरामध्ये जे पाणी वर्षानुवर्षे साठून राहते ते पाणी मिळवण्यासाठी बोरवेलचा वापर केला जातो आहे. जर तुम्ही बोरवेल खोदण्याचा विचार करत असाल तर हा लेख एकदा नक्की वाचा…

बोरवेल खोदण्यापूर्वी ‘हि’ काळजी घ्या :

● पाणी ज्या ठिकाणी शोधले आहे त्या ठिकाणी मशीन लागले आहे का? याची खात्री करा.
● खोदण्यासाठी शक्यतो लो प्रेशरच्या मशीनचा वापर करा. मशीन शक्यतो बेंड नसावी.
● पाणी जितके खोल लागेल तितके घातक असते त्यामध्ये क्षार व इतर घटक जास्त असतात.
● राज्यात सरकारमार्फत २०० फूट पेक्षा खोल बोरवेल खोदण्यासाठी बंदी आहे.

बोरवेल खोदल्यानंतर अशी काळजी घ्या :
● मोटार निवडताना बोरच्या आकाराची न घेता कमी इंचाची घ्या. अशाने ती अडकणार नाही.
● मोटार टाकताना शक्यतो स्टीलची टाकावी, लोखंडी नाही.
● हाय प्रेशरच्या मशीनने बोर घेताना पाणी लागले नाही तर त्यामध्ये पिंपभर पाणी टाकून घ्या. या प्रेशरमुळे १ इंची किंवा १.५ पाणी लागल्यास ते नळ बुजून जातात.
● बोर मारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मोटार टाकू नका. किमान ४-५ दिवस जाऊ द्या.
● रानाचा पोत पाहून केसिंग टाका. नाहीतर मोटार बोरमध्ये अडकू शकते.
● बोरवेलचे पुनर्भरण करणे आवश्यक असते.
● पाणी परीक्षण करूनच पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी करा.

अंदाजे आवश्यक खर्च – (२०० फूट बोरवेल)
● खोदणे : १४,०००/-
● केसिंग : १०,०००/-
● इतर : १,०००/-
● मोटार (५ Hp) : २३,०००/-
● स्टार्टर बॉक्स : ५,०००/-
● केबल : १०,०००/-
● पाईप (८ ) : ५,०००/-
● थ्री फेज सर्व्हिस वायर: ३,०००/-
अंदाजे एकूण खर्च : ७५,०००/-

 शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : 

https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues