Take a fresh look at your lifestyle.

शेतीसाठी फायदेशीर ‘टेक्नॉलॉजी’

0

जग बदलतेय तसा शेतीमध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब होतोय. कारण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सोपी, फायदेशीर, कार्यक्षम आणि सुरक्षित बनत आहे. विविध प्रकारचे अधिक कार्यक्षम तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात आल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. चला, त्यातील काही तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेऊयात…

  1. जीआएस सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती : हे सॉफ्टवेअर शेतीतील अचुकतेसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. पर्जन्यमान, तापमान, पीक उत्पन्न, वनस्पतींचे आरोग्या याविषयी जाणून घेण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.
  2. उपग्रह प्रतिमा : जर तुम्हाला पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज घ्यायचा असेल तर या तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला होऊ शकते. तसेच पिकाशी निगडीत विविध प्रकारची धोक्याची कारणे शोधता येतात. या उपग्रहाच्या साह्याने पिकांवर नजर ठेवता येते. त्यातून आपल्या आगामी धोक्याविषयी माहिती मिळते. ज्याचा नक्कीच फायदा होतो.
  3. ड्रोन आणि इतर हवाई प्रतिमा : या तंत्रज्ञानातचा विचार केला तर यात ड्रोनच्या मदतीने शेतांचे फोटो घेतले जातात. यामुळे पिकांचे बायोमास, पिकांची उंची, शेतातील पिकासाठी तन उपस्थिती सह पाण्याची संप्रुकता याच्या अचूकतेविषयी शेतकऱ्यांना अंदाज मिळतो. तसेच कीटकांचा हल्ला झाला तर ड्रोनच्या मदतीने फवारणी देखील केली जाते. रासायनिक नियंत्रण पद्धती लागू होण्याची शक्यता देखील कमी होते. याचा परिणाम म्हणजे पिकाच्या वाढीवर किंवा उत्पादनावर होतो.
  4. शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन डेटा : अचूकपणे सिंचन लागू करणे, दव किंवा उष्णतेचे नुकसान रोखणे यासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यास मदत करते. यामध्ये उपग्रह प्रतिमामधून प्राप्त पिकांच्या स्थितीवरील डेटा सह हवामानाचा डेटाचे विश्लेषण केले जाते.
  5. मर्जिन डेटा सेट्स : हे तंत्रज्ञान पिकांच्या देखरेखीसाठी वापरले जाते. सध्या आपली शेती कशी आहे? याची माहिती याद्वारे कळते. तसेच हवामानसंदर्भात माहिती देण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.

एकंदरीत विचार केला तर वरील तंत्रज्ञानाने शेतीला बराच फायदा होतो. त्यामुळे उत्पन्न वाढ असो कि सुरक्षित शेतीसाठी तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करायला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues