Take a fresh look at your lifestyle.

‘या’ संकरित गाई दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर!

0

शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय सर्रास केला जातो. कारण यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. आज आपण आपण अशाच तीन गाईंची माहिती पाहणार आहोत. ज्या दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर आहेत…

  1. होल्स्टिन फ्रिजीयन म्हणजे एचएफ गाय : या गाईची ओळख आहे सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून. सफेद रंगाच्या असणाऱ्या या गाईचे शरीर मोठे असते. तर वजन 580 किलोग्रॅम असते. या गाई अधिक दूध देतात. परंतु जास्त तापमान सहन करू शकत नाही. या गाई दररोज 25 ते 30 लिटर दूध देत असतात. त्यांच्या दुधात साडेतीन टक्के फॅट असते.
  2. जर्सी गाय : मुळतः इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या या गाई मध्यम आकाराच्या असतात. त्यांचा रंग लाल, कपाळ रुंद आणि डोळे मोठे असतात. तर वजन 400 ते 450 किलोग्रॅम असते. या गाई दिवसाला 12 ते 14 लिटर दूध देत असतात. त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली असते. भारतातील वातावरणात या गाई सहज राहत असतात. या गाई अधिक तापमान सहन करू शकतात.
  3. फुले त्रिवेणी गाय : ही गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञांनी या गाईची पैदास केली आहे. या गीर गायीची प्रजोत्पादन क्षमता, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण चांगले आहे.
लाळ्या खुरकत बद्दल जाणून घ्या, (पायखुरी, तोंडखुरी, FMD) | कृषिदूत

ही गाय एका वितात जास्तीत-जास्त 6 ते 7 हजार लिटर दूध देते. या गाईच्या दुधात 5.2 टक्के फॅट मिळतो.
या गाईची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून पुढच्या पिढीतही दूध उत्पादनाचे प्रमाण टिकून राहते. या गाईचा भाकड काळ हा 70 ते 90 दिवस असून रोजच्या सरासरी दुधाचे प्रमाण 10 ते 12 लिटर असते. या जातीच्या कालवडी 18 ते 20 महिने वयाच्या असताना माजावर येतात. तर पहिली गर्भधारणा 20 ते 22 महिन्यांत होते. तसेच या गाईच्या दोन वेतातील अंतर 13 ते 15 महिने एवढे असते.

Leave A Reply

Your email address will not be published.