Take a fresh look at your lifestyle.

असा ओळखा उसावरील रोगांचा प्रादुर्भाव; अन्यथा होईल मोठं नुकसान!

0

ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे. तसेच पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. सध्या कमी-जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आणि आर्द्रता यामुळे काही भागात रोगांचा प्रादुर्भाव दिसतोय. त्यामुळे रोगांची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करायला हव्या. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील…

पोक्का बोईंग रोग : हा रोग प्यूजॉरियाम मोनोलीफॉरमी या बुरशीमुळे होतो. तो वायुजन्य मार्गाने संक्रमित होतो त्याचबरोबर दुय्यम संसर्ग ऊसाचे कांडे, सिंचनाचे पाणी, तुरळक पाऊस आणि माती याद्वारे देखील होतो. यजमान पिकांमध्ये केळी, मका, कापूस, आंबा, ऊस आणि इतर महत्वाच्या पीकांवर या बुरशीचा वावर दिसतो. रोगजनक कोणत्याही जखमांद्वारे यजमान उतीमध्ये प्रवेश करत असतो.

रोगाची लक्षणे काय? :
● मार्च-एप्रिल महिन्यात लागवड केली तर या रोगाची लक्षणे आढळू शकतात.
● सुरूवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसते. पानांच्या नियमित आकारामध्ये बदल होताना पहायला मिळतो.
● पानाच्या खालच्या भागात सुरूवातीला फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. अशा पानांचा हळू-हळू आकार बदलून लांबी कमी होते. खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात किंवा वेणीसारखी गुंडाळली देखील जातात.
● प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसायला लागतात. जर रोगाची तीव्रता वाढली तर शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.

रोगाचे नियंत्रण करताना :
● रोगग्रस्थ दिसलेले रोप सर्वप्रथम रानातून उपटून जाळून किंवा पुरून टाका.
● बेणे प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती लिटरच्या हिशोबाने एक ताससाठी बेण तयार द्रावणात बुडवून ठेवा व त्यानंतर लागण करा.
● कॉपर ऑक्सी क्लोराईड २ ग्राम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
● क्सापोनाजोल (कंटॉप) २५० मिली १५० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्या. दोन-तीन फवारण्या १५ दिवसाच्या फरकाने घ्या.
● बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेड हे दोनी एकत्र ड्रीप द्वारे द्या. १ किलोग्रॅम बोरॉन आणि ५ किलो कॅल्शियम नायट्रेड असे सलग १० दिवसातून २ वेळा तरी सोडा.

तुमचा युरिया भेसळयुक्त नाही ना ? | युरियातील भेसळ ओळखा फक्त 2 मिनीटात | घरगुती जुगाड

तांबेरा रोगाचे लक्षण काय असतात? :
● तांबेरा हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होत असतो. ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करत असते.
● आधी बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूस होतो. त्यानंतर पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात.
● हळू-हळू ठिपके लालसर तपकिरी होतात. नंतर त्यांच्याभोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते.
● पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. हे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ते हवेद्वारे विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
● रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मेल्याने पाने करपतात. तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेत येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवर देखील परिणाम होतो.

रोग वाढीस अनुकूल बाबी :
● सकाळचे धुके, दव आणि थंड वातावरण.
● बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड.
● नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापर.

असे करा व्यवस्थापन :
● ऊस पिकाचे सर्वक्षण करा. त्यानुसार रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहूनच उपाययोजना करा.
● प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करा.
● निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरा.
● रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करा.
● लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्य प्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
● नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्या. कारण जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

नियंत्रण : जास्त प्रादुर्भाव दिसलातर (फवारणी प्रति लिटर पाणी). मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा टेब्युकोनॅझोल १ मि.ली. गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन २-३ वेळा फवारणी करा.

लक्षणे : पानांच्या मध्य शिरेवर गर्द लाल रंगाचे ठिपके दिसायला सुरुवात होते. पुढे हे ठिपके वाढून रक्तासारखे लाल होतात. तसेच पानाच्या कडा गडद होऊन मधला भाग वळतो. कधी-कधी पान ठिपक्याजवळ चिरते. शेंड्याकडील तिसऱ्या व चौथ्या पानावर देखील प्रादुर्भाव होतो. त्यानंतर पूर्ण शेंडा वाळून मोडून पडतो.

उपाय : रोगाचे प्रमाण कमी असतानाच रोगग्रस्त ऊस उपटन टाका. तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ओलावा असताना रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करा.

लक्षणे : लहान उसापेक्षा ७ ते ८ महिने वयाच्या उसामध्ये याचा अधिक प्रादुर्भाव दिसतो. यामुळे पानाच्यावरच्या बाजूस तपकीरी पिंगट ठिपके दिसतात. तर जुन्या पानांचा दोन्ही बाजूवर अंडाकृती, लालसर ते तपकीरी पिंगट ठिपके आणि ठिपक्याभोवती पिवळसर वलय दिसते. प्रादुर्भाव वाढला तर पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्यांमधील पेशी मरतात, प्रकाशसंश्लेषण क्रिया खंड होते. तसेच प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावल्यामुळे कांड्याची लांबी-जाडी देखील कमी होते.

फवारणी : प्रतिलिटर पाणी, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझॉल १ मिली किंवा मँकोझेब १ ग्रॅम.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues