Take a fresh look at your lifestyle.

कोंबड्यातील आजार ओळखा लक्षणांवरून, पोल्ट्री व्यवसायातील नुकसान टाळा

0
कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तसेच कोंबड्यांना शुद्ध हवेची कमतरता, समतोल आहाराची कमतरता इत्यादींमुळे कोंबड्यांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.या रोगावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तरकोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतुक होऊन नुकसान सोसावे लागते. या लेखात आपण कोंबड्यान वरील काही प्रमुख आजारांची माहिती व लक्षणे तसेच करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय योजना जाणून घेऊ.

कोंबड्यातील विविध आजार :

राणीखेत – राणीखेत (Ranikhet) हा कोंबड्यांवर प्रमुख आजार आहे. रानिखेत रोगाचा प्रभाव कोंबड्यावर झाला तर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची मर होऊ शकते. जवळजवळ शंभर टक्के कोंबड्या मरतात.

राणीखेतची लक्षणे :
लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागते,कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.थरथरणे,अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली इत्यादी लक्षणे दिसतात.तसेच मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोश्वास,भूक मंदावते,ताप येतो, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होते, अंडी उत्पादनात घट तसेच पातळ कवचाची व निकृष्ट दर्जाचे अंडी इत्यादी लक्षणे दिसतात.

रानिखेत आजारावर उपचार :
या आजारावर उपचार नाहीत. परंतु हा रोग होऊ नये यासाठी पिल्ले पाच ते सात दिवसांचे असताना लासोटा हीलस नाकात किंवा डोळ्यात एक थेंब या प्रमाणात द्यावी. तसेच आठवी आठवड्यात व 18 व्या आठवड्यात आर 2 बो(0.5मिली) कातडीखाली द्यावी.

रक्तीहगवण :
हा रोग कॉक्सिडीया या रक्तातील परजीवापासून होतो. विष्ठेमध्ये रक्त दिसते. विस्टा लालसर पातळ असते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्याचा तुरा कोमेजतो, कोंबड्या पेंगतात, खाणे कमी होते, अंडी उत्पादनही कमी होते, अशक्तपणा आढळतो तसेच कोंबड्यांची मरही मोठ्या प्रमाणात होते. हा रोग पूर्णपणे नियंत्रित करता येतो.

देवी :
हा रोग विषाणूपासून होतो. या रोगाची लागण झाल्यास कोंबड्यांचा तुरा व डोळे मलूल होतात. पायावर पिसे नसलेल्या भागावर पिवळे फोड येतात. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी फोडांवर खपली धरते व ती पडते. या खपली तून विषाणूंचा प्रसार होतो.या रोगाची लागण झाल्यावर भूक मंदावते,नाकातून द्रव्यपदार्थ वाहतो, तोंडात चिकट पदार्थ तयार होतो त्यामुळे कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरतात. या रोगाची लागण होऊ नये म्हणून सहाव्या व 16 व्या आठवड्यात देवी रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. रोग झाल्यास फोड आलेली जागा पोटॅशियम परमॅग्नेट चे द्रावनाणेधुऊन घ्यावी.

मरेक्स :
हा रोग ही विषाणूंमुळे होतो. कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. खाद्य खाऊ न शकल्याने कोंबड्या मरतात.हा रोग बहुतांशी लहान पिलांना होतो व त्यामुळे सात ते दहा आठवडे वयोगटातील पिल्ले मरतात.मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग पाचव्या ते सहाव्या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे कोंबड्यांचे पाय,पंख, मान लुळी पडते.वजन, श्वास घेण्यास त्रास होतो.विस्टा पातळ पडते व पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर उपाय नाही.प्रतिबंधक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाचे असताना मरेक्स ही लस द्यावी.

गंबोरो :
हा रोग विषाणूमुळे होतो.कोंबड्या पेंगतात, अडखळत चालतात, पांढरी हगवण होते व गुद्दारजवळची पिसे विष्टेमुळे घाण होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues