ICC women’s under 19 Cricket world cup : पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच भारताच्या लेकी बनल्या करोडपती!
दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात (ICC women’s under 19 Cricket world cup) अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने शफाली वर्माच्या (shafali verma) नेतृत्वात खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच महिला अंडर 19 पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे. टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत 7 गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले.
या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी मोठी घोषणा केली. आणि या घोषणेनंतर भारताच्या लेकी करोडपती बनल्या.. बीसीसीआयचे सचिव जय शाह ट्विट करून म्हणाले कि.. भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून 5 कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे.”
दरम्यान, भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला 5 कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.