Take a fresh look at your lifestyle.

ICC Test Rankings : आयसीसी कडून मोठी चूक : टीम इंडियाला अवघ्या 6 तासात नंबर-1 स्थानावरून हटवले, मागितली जाहीर माफी

0

ICC Test Rankings : बुधवारी म्हणजे काल आयसीसीने तीनही फॉरमॅटची क्रमवारी जाहीर केली. दुपारी भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर गेल्याचं आयसीसीच्या रँकिंगमध्ये होतं. तर संध्याकाळ होईपर्यंत पुन्हा एकदा आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असल्याचं सांगितलं. नेमके असे का घडले? हे बातमी वाचून तुम्ही होताल चक्कीत.. काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर..

आयसीसी कडून मोठा गोंधळ –
बुधवारी दुपारी दीड वाजता आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असल्याचं सांगितलं होतं. लगेच दोन मिनिटात टीम इंडिया क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अन् ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत होता. पण हा आनंद काही काळापुरताच मर्यादीत राहिला. कारण संध्याकाळी सात वाजता आयसीसीने पुन्हा कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया नंबर एक टीम असल्याचं सांगितलं.

आयसीसीच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे क्रमवारीत बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे 126 रेटिंग गुण आहेत. तर भारतीय संघाचे 115 गुण आहे. टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. 120 धावांच्या खेळीचा फायदा रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत झाला आहे. रोहित शर्माने नवव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर कसोटी रोहित शर्माने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 120 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा सध्या 786 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. तर ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर आहे. आर अश्विन गोलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues