Take a fresh look at your lifestyle.

HP employee news : Twitter, Meta नंतर आता ‘या’ नामांकित कंपनीत होणार हजारो कर्मचाऱ्यांची कपात

0

HP employee news जगातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter), मेटा (Meta) आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन (Amazon) नंतर आता आणखी एक नामांकित कंपनीमध्ये कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची शक्यता आहे.. देशात तसेच जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या समोर येत असल्या तरी देखील अनेक ठिकाणाहून देखील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. आता जगातील नामांकित कंपनी HP Inc येत्या 3 वर्षात 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे.

HP employee news मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 पर्यंत HP मध्ये सुमारे 51,000 कर्मचारी कार्यरत होते. 2019 मध्ये HP नं घोषणा केली होती की ते 7,000 ते 9,000 कर्मचारी काढून टाकतील. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा निर्णय घेतला गेला आहे. HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे 10 टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय म्हणजे कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग असून HP मध्ये सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळं कंपनींना हा निर्णय घेतलाय.

HP employee news कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगीतल्या प्रमाणे.. चौथ्या तिमाहीतील महसुलात 11.2 टक्क्यांनी घट झाली असून जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $14.8 अब्ज नोंदवली गेली होती. सोबतच HP ची डेस्कटॉप विक्री देखील कमी झाल्याने हा निर्णयामागील एक कारण नमूद केले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांवर हे मोठे संकट असल्याचे सांगतले जाते.

HP employee news दरम्यान, HP Inc ची टाळेबंदी हे सूचित करते की जगातील अनेक देशांमध्ये मंदीची भीती आधी पेक्षा अधिक गडद होत आहे. चढे व्याजदर आणि वाढत्या महागाईच्या जमान्यात Amazon, Meta, Twitter सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी टाळेबंदीचे संकेत दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues