Gram Panchayat तुमच्या ग्रामपंचायतीनं नक्की किती पैसा खर्च केला? असे पहा!
Gram Panchayat आमच्या ग्रामपंचातीचा विकास होत नाही? आम्हाला योग्य लोकप्रतिनिधी मिळाला नाही अशा गप्पा मारणे सोप्पे आहे. मात्र एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या याबद्दल सजग असणे गरजेचे आहे. आपण ग्रामपंचयातीला एकूण किती निधी मिळाला? कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला? त्यापैकी निधी खर्च झाला? याची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी खालील गोष्टी करा.. e gram swaraj
● सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा. “ई-ग्राम स्वराज” e gram swaraj नावाचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
● अॅप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. gram panchayat
● यात तुमचे स्टेट, राज्यपासून ते ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडा.
● यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
● आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यात तुम्हाला तुमच्या गावाचं नाव, कोड क्रमांक तसेच इतर सर्व माहिती दिसेल.
● तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्षं निवडा.
● त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेग-वेगळे पर्याय येतील. यातील पहिला पर्याय ER Details असेल. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते.
● यावर क्लिक करून तुम्ही गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती पाहू शकता. हे अॅप्लिकेशन नुकतंच लाँच करण्यात आल्याने अजून माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्व गावांमधील प्रतिनिधींची नाव दिसतील असं नाही.
● मात्र गावाच्या विकासकामासाठी सरकारनं किती पैसा दिला? त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीनं Gram Panchayat खर्च केला? हे तुम्ही पाहू शकता.
● दुसरा पर्याय आहे Approved activities हा. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर झाला आहे? हे सांगितलेले असते.
● तिसरा जो पर्याय आहे Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते. यावर क्लिक केल्यास त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.
● त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला? त्यापैकी निधी खर्च झाला? याची माहिती असते.
Gram Panchayat जर निधी उरला तर काय होते? :
● ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो.
● निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजावं.
● पैसै परत गेले तर याचा अर्थ सरपंचाना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नाही. म्हणजे ग्रामपंचायत गावाचा विकास आराखडा तयार करू शकली नाही.
Gram Panchayat अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/