Take a fresh look at your lifestyle.

भारतात कसा होता 1G ते 5G चा संपूर्ण प्रवास? जाणून घ्या कोणते नेटवर्क कोणत्या वर्षात आले..

0

सध्या संपूर्ण जगात 5G इंटरनेटची चर्चा असून भारतातील अनेक भागात 5G इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. तर पुढील काही दिवस संपूर्ण भारतात 5G इंटरनेटसेवा सुरु होणार असल्याचे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी सांगतले आहे. मागील काही दिवस बंगलोर, हैद्राबाद, कोलकाता, गुजरात, पुणे, मुंबई यांसारख्या अनेक शहरातील युजर्स 5G नेटवर्कवर हायस्पीड इंटरनेटचा अनुवभ घेत आहे. पण, इंटरनेटचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. एरिक्सनच्या म्हणण्यानुसार, 1980 साली जगाने पहिल्यांदा 1G नेटवर्क तयार झाले इथून सुरू झालेला प्रवास आताच्या घडीला 5G पर्यंत येऊन पोहचला आहे.

जाणून घ्या 1G ते 5G चा संपूर्ण प्रवास :

जगाने सर्वात आधी 1980 मध्ये मोबाइल नेटवर्क विकसित केले, ज्याला 1G मोबाइल नेटवर्क म्हटले गेले. 1G नेटवर्कच्या युगात ब्रीफकेस-आकाराचे फोन आणि तुलनेने कमी व्यावसायिकांमधील लहान संभाषणांसाठी वापरले जात होते. त्यानंतर हे नेटवर्क फक्त मोबाईल व्हॉईस कॉलसाठी वापरले जात होते.

1990 मध्ये, पुढील पिढीतील सेल्युलर नेटवर्क 2G चा शोध लागला. व त्यानंतर मोबाईल व्हॉईस कॉल्ससोबतच smsची सुविधाही जोडण्यात आली. या नेटवर्कनंतर, मोबाईल फोन्सची वाढलेली मागणी अद्यापही सुरुच आहे.

तर 2000 मध्ये सेल्युलर नेटवर्कची तिसरी पिढी म्हणजेच 3G विकसित करण्यात आली. या नेटवर्कचं सर्वात मोठं विशेष म्हणजे या सेवेमध्ये मोबाइल वेब ब्राउझिंग आले. त्यामुळे मोबाईलच्या वापरात प्रचंड बदल झाला. या नेटवर्कचे आश्‍चर्य म्हणजे smsआणि मोबाईल इंटरनेटसोबत मोबाईलचा आकार माणसाच्या खिशात मावेल इतका झाला.

2010 मध्ये, जगाने वेगवान इंटरनेट, मोबाइल व्हिडिओ इत्यादीसाठी 4G सेल्युलर नेटवर्कचा शोध लावला. या नेटवर्कमध्ये स्मार्टफोन, अँप स्टोअर आणि यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म सर्वांना अनुभवायला मिळाले.

आता जगात 5G सुरू झाले असून आणि जगासह भारततेही याचा ट्रायल सुरू आहे. भारतात 5G फोन आधीच उपलब्ध झाले आहेत, 5G नेटवर्क देखील पुढील वर्षी मिळण्यास सुरुवात होणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 2035 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 5G नेटवर्क 13.2 ट्रिलियन डॉलर इतकं होण्याचा अंदाज असून ही सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी (5G) आहे. हे नेटवर्क 4G पेक्षा 100 पट वेगवान असणार असल्याचे सांगतले आहे.

Computer Shortcut Keys : तासाचे काम होईल काही मिनिटात; फक्त ‘हे’ शॉर्टकट किज लक्षात ठेवा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues