Take a fresh look at your lifestyle.

कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वापरताय? उद्यापासून Windows चा हा Version होणार बंद; लवकरात लवकर करून घ्या हे काम

0

तुम्ही कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वापरताय? मग हि बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची… कारण तुम्ही जर ऑफिसच्या किंवा घरच्या कामासाठी कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वापरात असाल तर आजच्या आज तुम्हाला Windows चा Version बाबतचे सर्व कामे उरकून घ्या.. अन्यथा तुमचे कॉम्पुटर अथवा लॅपटॉप बंद पडू शकतो.

कारण सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज व नामांकीत मायक्रोसॉफ्ट कंपनीने (Microsoft) आपल्या यूजर्सला धक्कादायक बातमी दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची फ्लॅगशिप ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 8.1 (Windows 8.1) उद्यापासून बंद होणार असून कंपनीने काही दिवसांआधीच 10 जानेवारी 2023 पासून विंडोजचे हे व्हर्जन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता..

आता युजर्सला काय करायला हवं?

मायक्रोसॉफ्टने युजर्सला सल्ला दिला आहे की, जे युजर्स हे व्हर्जन वापरत आहेत त्यांनी त्यांचे डिव्हाइस विंडोजच्या सध्या कार्यरत असलेल्या व्हर्जनवरून अपग्रेड करावे. कंपनीने वेबसाइटद्वारे सांगितले आहे की, जर तुम्ही सध्याच्या रिलीझसह व्हर्जन डाउनलोड करू शकत नसाल, तर तुम्ही तुमचे डिव्हाइस विंडोज 11 चालवणाऱ्या डिव्हाइससह अपडेट वापरू शकतात.

Windows 11 कसे अपडेट कराल?

  • सर्वप्रथम तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या डाउनलोड विंडोज 11 वेबसाइटवर जावे लागेल. येथे गेल्यानंतर खाली स्क्रोल करावे लागेल आणि डाउनलोड Download Windows 11 Disk Image (ISO) सेक्शनवर जा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून डाउनलोड निवडा वर क्लिक करून Windows 11 (मल्टी-एडीशन ISO) निवडा.
  • खाली स्क्रोल करा आणि ड्रॉप डाउन मेनूमधील Product Language वर क्लिक करा. यानंतर आता येथे तुम्ही तुमची भाषा निवडा आणि Confirm वर क्लिक करा.
  • आता ISO फाइल मिळवण्यासाठी 64-बिट डाउनलोड निवडा.
  • फाइल एक्सप्लोरर उघडा आणि डाउनलोड केलेल्या फाइलच्या फोल्डरवर जा. येथे ISO फाईलवर राईट क्लिक करा आणि Mount वर क्लिक करा.
  • सेटअप सुरू करण्यासाठी setup.exe फाइलवर डबल क्लिक करा.
  • Install Windows 11 पेज आल्याव, चेंज हाऊ सेटअप डाउनलोड्स अपडेट्स लिंकवर क्लिक करा आणि Not right now आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे डिव्हाइस हे व्हर्जन install करू शकत असल्यास येथे license terms accept करून Next वर क्लिक करा.
  • जर तुम्हाला वैयक्तिक फाइल्स ठेवायच्या असतील तर त्याची पुष्टी करा आणि install वर क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues