Take a fresh look at your lifestyle.

Varas Nondani वारस नोंद करताय? मग वाचायला हवं…!

0

Varas Nondani जमिनीचा व्यवहार म्हटलं कि, वारस नोंदणी हा शब्द कानी पडतो. जर शेतजमीनीचा मालक मृत झाल्यास, त्याच्या वारसांना सदर जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी संबंधित जमिनीवर वारसाची नोंद करावी लागते. चला, तर त्याबाबत अधिक जाणून घेऊयात…

Varas Nondani मृत खातेदाराच्या वारसाची नोंद असणाऱ्या वहीस गाव नमुना सहा क असे म्हणतात. सर्वप्रथम वारस नोंदी या रजिस्टरमध्ये नोंदवून नंतर वारसाची चौकशी केली जाते. त्यानंतर नक्की कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीत लावायचे? याबाबत वारस ठराव मंजूर होतो. यानंतर नोंदवहीत परत फेरफार नोंद केली जाते. तसेच वारसा बाबत तक्रार असेल तर शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देखील मिळते.

Varas Nondani वारस नोंदीसाठीसाठी काय आवश्यक आहे?

● साधारणतः खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर किमान तीन महिन्याच्या आत नोंदी व्हायला हवी.
● आपल्या अर्जामध्ये संबंधित खातेदार कोणत्या तारखेला मयत झाला? संबंधित गटातील किती क्षेत्र त्या खातेदाराच्या नावावर होते? खातेदारास एकूण किती जण वारस आहेत? याची माहिती द्यावी लागते.
● मयत खातेदाराचा मृत्यू दाखला, नावावरचे 8अ चे उतारे, सर्व वारसांचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते, वारसा असलेल्या व्यक्तींचे पत्ते, शपथेवरील प्रतिज्ञापत्र आदी बाबी सादर कराव्या लागतात.
● तसेच व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार या नोंदी घेतल्या जातात.

Varas Nondani अशी आहे वारस नोंदीची प्रक्रिया
● सर्वप्रथम वारसांनी मयत खातेदाराच्या मयत दाखला काढून घ्यावा.
● खातेदाराच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज करायला हवा.
● नोंदीसाठीच्या अर्जाची नोंदणी रजिस्टरमध्ये केली जाते.
● यानंतर वारसांना बोलावून गावातील सरपंच, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना वारसांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीचे चौकशी होते. रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर झाल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद होते व त्यानंतर वारसांना नोटीस दिली जाते.
● जवळपास पंधरा दिवसानंतर फेरफार नोंदीबाबत कायदेशीर आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित किंवा रद्द केली जात असते.

Varas Nondani ‘ही’ आहेत वारस प्रमाणपत्रसाठी आवश्यक कागदपत्रे :

● विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प लावलेला अर्ज व शपथ पत्र व मृत्युपत्र.
● तलाठी/ मंडळ अहवाल
● शासकीय नोकरी नसल्यास पुरावा (उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा)
● रेशन कार्डची प्रत
● मृत खातेदार पेन्शन धारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटची पेन्शन उचलली त्या पानाची प्रत.
● ग्रामपंचायत/ नगरपालिका यांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदवहीतील उतारा
● वारसा हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारसा हक्क व नॉमिनी हे वेगळे असतात) बँक, विमा रक्कम इत्यादी बाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराचे रक्कम ज्या व्यक्तीकडे जाते किंवा देण्यात यावी असे नमूद केलेले नाव त्यालाच ती मिळते.
● वारसा हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद वहिवाट इत्यादी बाबींसाठी महत्त्वाचे असते.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues