Take a fresh look at your lifestyle.

माजावर आलेली शेळी कशी ओळखावी?

0

१) माजावर आलेली शेळी अस्वस्थ असते तसेच सारखी ओरडते व उठ-बस करते.
२) माजावर आलेली शेळी वारंवार लघवी करते, शेपूट हलवते तसेच बोकडाने अंगावर उडी मारल्यास शांत
उभी राहते.
३) माजावर आलेल्या शेळीचे खाण्या-पिण्यावर लक्ष नसते तसेच ती शेळी इतर शेळ्यांवर उडी मारते.
४) शेळीच्या योनीमार्गातून पांढरा चिकट स्त्राव गळतो किंवा गोठ्यामध्ये तो तुटून पडलेला असतो.
५) शेळ्यांमधील मुका माज ओळखण्यासाठी शेळ्यांच्या कप्प्यात बोकड सोडावा वासाने तो माजावर आलेली
शेळी ओळखतो.
६) या काळात शेळी दूध कमी देते तसेच शेळीची योनी लालसर व थोडीशी सुजलेली दिसते.
७) सकाळी माजावर आलेल्या शेळीला संध्याकाळी बोकड दाखवावा व संध्याकाळी माजावर आलेल्या शेळीला
सकाळी बोकड दाखवावा.
८) आहार व्यवस्थापन चांगले नसल्यास व शेळ्यांचे वजन कमी असल्यास शेळी माज दाखवत नाही. त्यामुळे
सकस आहार द्यावा.


९) शेळी दर 21 दिवसांनी माजावर येते व माजाचा काळ ३० ते ३६ तासांचा असतो.
१०) कमी वयाच्या व कमी वजनाच्या शेळ्यांना नैसर्गिक रेतन करू नये कारण त्यांच्या पिशवीची वाढ पूर्ण
झालेली नसते.
११) मार्च ते जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त शेळ्या माजावर येतात तेंव्हा काळजीपूर्वक लक्षात ठेवावे.
१२) धेनू ॲप मधील पशुव्यवस्थापन मध्ये नोंदी ठेवल्यास नोटीफिकेशनद्वारे माजाची संबंधित तारीखही
आपणास समजू शकते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक :
नितीन रा.पिसाळ, राहुल द.गलंडे
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा-9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues