Take a fresh look at your lifestyle.

असे काढा किसान क्रेडिट कार्ड? मिळेल 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज

0

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी आता किसान क्रेडिट कार्डची किचकट कर्ज प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. हे कार्ड घेण्यासाठी बँकांची फी देखील रद्द करण्यात आली आहे. या कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

काही मूलभूत कागदपत्रे : आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो.

3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज : या कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजाने मिळते. यावर 2 टक्के सूट दिली जाते. तसेच वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के अतिरिक्त सूट मिळते. या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. मात्र शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणे आवश्यक असते.

किसान क्रेडिट कार्ड नक्की कसं बनवणार? : हे कार्ड बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आले आहे. यासाठी बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश दिले गेले आहेत. या कार्डसाठी अर्ज करायचा असेल तरपीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जा. तेथे तुमच्या जमीनीची, पिकाची माहिती भरा. यानंतर अर्जाची प्रिंट बँकेत नेऊन जमा करा.

क्रेडिट कार्ड कोण बनवू शकतं? :
● शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तो ही.
● कर्जाची मुदत संपेपर्यंत अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 आणि जास्तीत-जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.
● 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. मात्र सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.