Take a fresh look at your lifestyle.

NA Plots जमीन NA (एनए) करण्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत!

0

NA Plots सध्या विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर जागेची मागणी वाढत आहे. परंतु शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत. त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. तर काहींना ती माहित असली तरी त्याचे पूर्ण ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे एनए करण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे, ती कशी करावी लागते हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल ( कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.

NA Plots आवश्यक कागदपत्रे :
● जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाचा ५ रुपयांचा स्टॅम्प.
● जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्याचा ४ झेरॉक्स.
● जमिनीचा फेरफार उतारा.
● जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड नसेल तर महसूल अधिकारी (तलाठी किंवा तहसीलदार) यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र.
● जमिनीचा ८ अ चा उतारा.
● तालुका भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा.
● इमारतीसाठी एनए करायचे असल्यास बिल्डिंग प्लॅनच्या ८ प्रती.
● चालू ७/१२ उतारा.
● राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र. (जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर)
● ग्रामीण भागात ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, शहरी भागात महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.
● एनएसाठी परवानगी ४३/६३ नुसार मिळेल. (जमीन बॉंम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर)
● जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटीचे कोणतेही कर्ज किंवा भरणा नसल्याचा दाखला.
● जमीन एनए करायची असल्यास ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र.

NA Plots एनए करताना सरकारकडे भरावा लागणारा नजराणा – एनए जमीनाचा त्या -त्या कामासाठी उपयोग झाला नाही तर तर तिची एनए म्हणून नोंद रद्द होते आणि भरलेला नजराणा सरकार जमा होतो.
● शेत जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असल्यास रेडी रेकनर (सरकारने ठरवलेला भाव) नुसार जमिनीच्या ५०% रक्कम भरावी लागते.
● शेतजमिनीचे व्यवसायिक जमिनीत रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या ७५% रक्कम भरावी लागते.
● शेतजमिनीचे निम-सरकारी जागेत रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या २०% रक्कम भरावी लागते.
● रहिवासी एनएचे औद्योगिकमध्ये रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या किमतीच्या २०% रक्कम भरावी लागते.

NA Plots अर्ज कुठे आणि कसा करावा? :
१) जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करा.
२) जिल्हाधिकारी हा अर्ज ७ दिवसात तहसीलदारांना तुमचा अर्ज पाठवतात.
३) तहसीलदार सदर अर्जाची छाननी करून अर्जदार व्यक्तीच जमिनीचा मालक असल्याची खात्री करतात. तसेच तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करतात.
५) तहसीलदार जमीन एनए केल्यास कोणत्याही पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पास धोका पोहचणार नाही ना? याची पडताळणी करून घेतात.
६) वरील सगळी तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतरांचा आदेश काढतात.
७) रूपांतरणाचा आदेश काढल्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची ‘एनए’ नोंद केली जाते.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues