Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, हीच ती वेळ माती परीक्षणाची! जाणून घ्या मातीचा नमुना कसा घ्यावा?

0

शेतातील खरीप पिकाची काढणी केल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत.

सामान्यतः आपल्या शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षांतून एकदा परीक्षण करायला हवे. मात्र वर्षानुवर्षे शेतात तेच पिक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते.

शेतातील खरीप पिकाची (kharif crop) काढणी केल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला रासायनिक किंवा सेंद्रिय खत दिल्यानंतर तीन महिन्यानंतरच मातीचा नमुना घ्यावा. प्रातिनिधिक नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावे लागतात. नमुने घेण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे, पिशवी या वस्तू सोबत ठेवाव्यात.

नमुना घेताना (Soil Sample Collection) :

-पाण्याच्या स्त्रोता जवळील नमुना घेऊ नये.
-जनावरे नेहमी बसण्याची जागेवरील नमुना घेऊ नये.
-विविध खते किंवा कचरा टाकण्याच्या जागेरील नमुने घेऊ नयेत.
-बांध्यावरील किंवा झाडाच्या खालील जागेवरील नमुना घेऊ नये.

हेही वाचा : Krushidoot : टरबूज लाल आणि खाण्यासाठी गोड असेल हे कसे ओळखावे? वाचा सोप्पी पद्धत..

मातीचा नमुना प्रातिनिधिक असावा. शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषांची लांबी जमिनीच्या लांबी-रुंदीनुसार कमी-जास्त करावी. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील सर्व पालापाचोळा, तण काढून टाकावे. त्या ठिकाणी एक वितभर खोल खड्डा खणून घ्यावा. खड्डा ‘v’ आकाराचा असावा.

खड्याच्या एका बाजूची ४ सेमी जाडीची माती खुरप्याने तासून ती माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने १० ते १२ ठिकाणाहून गोळा केलेली माती पॉलिथिनच्या तुकड्यावर पसरून घ्यावी. मातीत असणारे खडे आणि वनस्पतीची मुळे काढून टाकावीत. त्यानंतर नमुन्याचे चार समान भाग पडून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी अर्धा किलो माती उरेपर्यंत ही प्रक्रिया करावी. हा मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.

विविध हंगामातील पिकांकरिता वेगवेगळ्या खोलीचे नमुने घ्यावे लागतात. भात, नागली, भुईमुग पिकांसाठी २० ते २५ सेंटीमीटर खोलीचा खड्डा खणावा लागतो. बागायती पिकांसाठी ३० ते ४० सेंटीमीटर खोलीचा खड्डा तर फळपिकांसाठी ६० सेंटीमीटर खोलीचा खड्डा खणावा.

Leave A Reply

Your email address will not be published.