Take a fresh look at your lifestyle.

गायीचा माज नक्की कसा ओळखायचा? वाचा!

0

दुग्ध व्यवसायासाठी संगोपन करीत असलेले जनावरे हे नियमित माजावर येऊन गाभण राहणे गरजेचे असते. तसेच दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व अधिक नफा कमविण्यासाठी योग्य वेळी गाय किंवा म्हशीचा माज ओळखता येणे गरजेचे असते.

एका निरीक्षणानुसार भारतातील एकूण गायींपैकी सुमारे ४५ टक्के गायी दरवर्षी नियमितपणे माजावर येतात, तर ४० टक्के गायी अनिश्चित वेळी माजावर येतात. तर उरलेल्या १५ टक्के गायी वांझ असतात. अनेकदा आपली गाय माजावर आली आहे हे मालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गायी भाकड राहण्याचा कालावधी वाढतो.

यामुळेच गायीचा माज लक्षात येणे दुग्ध व्यवसायात महत्वाचे आहे. गाय माजावर आल्यावरच तीला वेळीच भरविता येते. वयात आलेली गाय वेळीवेळी प्रजनन संस्थेतील विविध भागात माज दाखवत असते. ते ओळखण्याची निरीक्षणशक्ती व चिन्हे माहिती असायला हवी.

गाय माजाची लक्षणे : साधारणपणे गाय संध्याकाळच्या वेळी माजावर येते. म्हणून रोज संध्याकाळी गोठ्यात चक्कर मारा. त्यामुळे गोठ्यातील कोणती गाय माजावर आहे? हे ओळखून वेळेवर भरविता येते.
१) अशी जनावरे अस्वस्थ, बेचैन होते. इतर जनावरांसोबत टक्कर घेणे, वारंवार लघवी करणे, दूध कमी देणे, कमी आहार घेणे, सतत पाठ घासणे, अवेळी पान्हावणे.
२) वारंवार हंबरणे, जननेंद्रिय भागातून स्वच्छ पारदर्शक अंड्याच्या बलकासारखा द्रव लोंबतांना दिसणे.
३) योनीला सूज, कडा लालसर दिसणे.
४) गायीचे चारा खाण्यात लक्ष नसणे, रवंथ न करणे.
५) माजावरील जनावर दुसऱ्या जनावरावर उडते आणि दुसरे जनावर त्या जनावरावर उडल्यास उडू देते आणि स्वस्थ उभे राहते.
५) शेपटी उंचावलेली असणे, वारंवार थोडी-थोडी लघवी करणे.
६) चांगल्या माज दाखविणाऱ्या गायी ओरडतात.

गायी माजाच्या काळाचे तीन भाग पडतात : सुरुवातीचा काळ, मधला काळ, शेवटचा काळ..

  1. सुरुवातीचा काळ : यात पहिल्या ६ ते ८ तासात माजाची स्थिती असते. त्यातील लक्षणे म्हणजे गाय हंबरते, दुसर्‍या जनावरांचा वास घेते (हुंगते), दुसर्‍या जनावरावर उडण्याचा प्रयत्न, निरण ओलसर, लाल व सुजलेले दिसते.
  2. मधला काळ : माजाच्या ९ ते १८ तासांच्या काळाला माजाचा मधला काळ असे म्हणतात. यामध्ये गाय कमी दूध देते. गाईचे खाण्यात लक्ष नसते. जननेंद्रिय लालसर, ओली व सुजलेले दिसते. जननेंद्रियातून स्वच्छ सोट लोंबतांना दिसतात. माजावरील गाय दुसरे जनावर तिच्यावर उडत असताना स्वस्थ उभी राहते.
    ३. शेवटचा काळ : माजाच्या १८ ते २४ तासांचा कालावधी हा माजाचा शेवटचा काळ असतो. यामध्ये जननेंद्रियातून स्वच्छ व थोडा घट्ट स्राव लोंबतो. यात गाय इतर गायींना स्वत:वर उडी मारु देत नाही.
लाळ्या खुरकत बद्दल जाणून घ्या, (पायखुरी, तोंडखुरी, FMD) | कृषिदूत | Krushidoot | प्रा. नितीन रा. पिसाळ

गाय माजाच्या वेळी करावयाचे निरीक्षण : गाय माजावर आली असतांना जननेंद्रियातून भागातून जो सोट गळतो तो स्वच्छ व पारदर्शक म्हणजेच काचेसारखा तरल असल्यास गाईचे गर्भाशय निकोप असण्याचे लक्षण आहे.

गर्भाशयाचा दाह असलेल्या गायी किंवा म्हशीच्या माजाच्या वेळीचा सोट पांढरा किंवा पिवळसर दिसतो. अशा गायी भरवुन घेतल्यास त्या उलटन्याची शक्यता अधिक असते. दरम्यान अशावेळी गायीला पशुवैद्याला दाखवून गाईच्या गर्भाशयावर उपचार ‘करुन गर्भाशय स्वच्छ व निकोप करुन घ्या. त्यानंतरच या गायी भराव्यात.

गायीला माजावर आल्यानंतर १२ ते २४ तासांत भरवा. म्हणजेच सकाळी माजावर आलेली गाय संध्याकाळी किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळ पर्यंत भरण्यास हवी. यानंतर किंवा यापूर्वी गाय भरविल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही.

गायीचा मुका किंवा मंद माज ओळखायचा असेक तर गायीच्या कळपात वळू सोडल्यास तो वासाने माजावर आलेली गाय ओळखून काढतो. त्या वळूपासून फलधारणा देखील होत नाही.

सर्वसाधारणपणे गावठी गायीच्या फलधारणेसाठी २ ते ३ तर संकरीत गायीमध्ये हे प्रमाण १ ते २ रेतनाची जरुरी असते. परंतु काही गायींना अधिक रेतन देखील करावे लागतात. सर्वसाधारणपणे माजाच्या १२ ते २० तासांचा काळ गर्भधारणा होण्यासाठी योग्य काळ आहे. शहरी भागामध्ये किंवा पशुचिकित्साची सोय असलेल्या ठिकाणी वीर्याची उपलब्धता व रेतनाची सोय होणे शक्य असल्याने यावेळेत कृत्रिमरीत्या गायी भरविणे शक्य होते.

माजाचे प्रकार : जनावर माजावर आल्यानंतरची लक्षणे पाहून त्यावरुन माजाचे प्रकार सांगता येतात. लक्षणांच्या तीव्रतेवरुन माजाचे टन प्रकार सांगितले जाते.
१) मुका किंवा माज : यात जनावर ओरडत नाही किंवा दुसऱ्या जनावरावर उडत नाही. सतत लघवी करणे आदी लक्षणे दिसतात.
२) नेहमीचा नियमित माज : वर वर्णन केलेली सर्व माजाची लक्षणे यात दिसून येतात.
३) तीव्र माज : यातील सर्व लक्षणे तीव्र स्वरुपात दिसून येतात. सर्वसाधारणपणे संकरीत गायीमध्ये अशी लक्षणे दिसतात. यामुळे जनावरांचा माज ओळखणे सोपे जाते.

संकरीत कालवड योग्य प्रकारे जोपासली आणि तिची व्यवस्थित वाढ झालेली असेल तर ती साधारणतः १३ ते १६ महिन्यात वयात माजावर येते. तसेच गाय व्याल्यानंतर ६० दिवसांत प्रथम माजावर येते. मात्र जर अशाप्रकारे माजावर आली नाही तर पशुवैद्याकडून तपासून घेउन उपचार करणे आवश्यक आहे.

गाय माजावर न येण्याची कारणे? :
जनावर गाभण असल्यास.
● जनावर अशक्त असेल, नुकतेच आजारातून बरे झाले असेल तर.
● जनावराला जंत झाले असल्यास.
● जनावराच्या खाण्यात प्रथिनांचे प्रमाण कमी झाले तर.
● जनावराच्या आहारात क्षाराची कमतरता असेल तर.
● गर्भाशयाचा किंवा योनीचा आजार असल्यास.
● बीजांडावर विकृती असेल तर.
● वासरू अंगावर पित असल्यास.
● आनुवंशिक गुणवत्ता कमी असेल किंवा गर्भशयात जन्मजात विकृती असेल तर.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues