Take a fresh look at your lifestyle.

हिराबेन मोदी यांचे निधन : जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोदी यांच्या आईने आपल्या संपूर्ण आयुष्यात खूप संघर्ष केला असल्याचे पंतप्रधानांनी व त्यांच्या सर्व भावंडानी अनेकदा सांगतले आहे. त्यांनी आज पर्यंत आपल्या जीवनात काय काय संघर्ष केला आहे जाणून घेऊया थोडक्यात..

हिराबेन मोदी यांच्या संघर्षाबाबत थोडक्यात :

हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी मोठे शिक्षण घ्यावे.

हिराबेन यांनी लहानपणीच आपली आई गमावली :

हिराबाच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ब्लॉगमध्ये माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, त्यांच्या आई हिराबेन यांचा जन्म पालनपूर, विसनगर, मेहसाणा, गुजरात येथे झाला होता. जे वडनगरपासून अगदी जवळ आहे. लहान वयातच तिने स्पॅनिश फ्लूच्या साथीने तिची आई गमावली. हिराबेनला त्यांच्या आईचा चेहराही आठवत नाही. त्यांचे संपूर्ण बालपण आईशिवाय गेले. परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन लिहिता वाचायलाही जमले नव्हते. त्यांचे बालपण गरिबीत गेले.

हिराबेन यांचा असा असायचा दिनक्रम :

पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी सांगितले की, त्यांची आई सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा विहिरीतून पाणी आणत असे. तलावावर कपडे धुण्यासाठी जाते. बहुतेक वेळा घरचे अन्न खात असे. बाहेरचे खाणे टाळायची. आईला आईस्क्रिम खूप आवडते. यासाठी ती कधीच नकार देत नाही. ती नेहमी कामात व्यस्त असते. पहाटे चार वाजता दिनक्रम सुरू असायचा. त्यानंतर त्या आधी घरची कामे करायच्या. मग ती दुसऱ्यांच्या घरी कामाला जायची. मुलाला वाढवण्यासाठी तिने खूप कष्ट केले.

घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्याचे काम

हिराबेन केवळ घरातील सर्व कामे स्वतःच करत नव्हत्या, तर आर्थिक उत्पन्नासाठी देखील काम करत होत्या. त्या काहींच्या घरी धुणीभांडी करायच्या आणि घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्यासाठी वेळ काढायच्या. हिराबेन यांनी त्यांच्या जीवनात अनेक दैनंदिन संकटांना तोंड दिले आणि यशस्‍वीपणे मात केली.

Share Market Update : आज 2022 वर्षातील शेवटचा ट्रेडिंग दिवस, गुंतवणूकदारांनो जाणून घ्या आजची मार्केटची परिस्थिती

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues