Take a fresh look at your lifestyle.

Hemoglobin : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खास टिप्स

0

योग्य आहार आणि विहारावर देखील आरोग्य अवलंबून असते. आपण सकस आहार घेतला तर शरीराला आवश्यक घटक मिळतात. जर योग्य आहार नसेल तर ने शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून शरीरात रक्तप्रवाह सुरू राहणं फार महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया हिमोग्लोबिन (Hemoglobin) वाढवण्यासाठी खास घरगुती टिप्स..

खजूर (Dates)

शरीरात रक्ताची कमतरता झाल्याव कमजोरी येऊ लागते. त्यामुळे चक्कर येणे, डोकं चक्रावतं, हात-पाय थरथरतात. म्हणून खजूराचं सेवन केलं पाहिजे. तुमची शरीराची ताकद वाढेल. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

मनुके (Raisins)

मनुक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. यात आयर्न भरपूर प्रमाणात असतात. हे अनेकदा ज्यूससोबत, सकाळी ओट्ससोबत किंवा रात्री भिजवून ठेवून सकाळी रिकाम्यापोटी याचं सेवन करता येतं. मनुक्यात साधारण 3.3 ग्रॅम फायबर असतं. ज्याच्या सेवनामुळे आतड्यांची समस्या दूर होते.

तीळ (Sesame)

तिळ शरीरासाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळेच फार पूर्वीपासून लोक उत्सवात तिळ आणि गूळाचं सेवन करतात. यातील भरपूरपर प्रमाणात आयर्न, फ्लेवोनाइड, कॉपर आणि इतर पोषक तत्व असतात. ज्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

काजू (Cashew Nuts)

काजूमध्ये भरपूर लोह असते. मूठभर काजूमध्ये 1.89 मिलीग्रामपर्यंत लोह असते. जर तुम्हाला लोहाची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही नियमित आहारात काजूचा समावेश करू शकता.

आवळा (Amla)

अनेक आजरांवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर त्यात असलेल्या आयर्नमुळे अॅनिमियामध्येही हे फायदेशीर मानले जाते.

बदाम (Almonds)
बदामाला सर्व ड्रायफ्रुट्सचा राजा मानला जातो. बदामामध्ये पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. भिजवलेले बदाम रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जर तुम्ही मूठभर बदाम खाल्ले तर तुम्हाला 1.05 मिलीग्रामपर्यंत लोह मिळते. अनेकांना बदामाचे दूध आणि बदाम बटर खायलाही आवडते. तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश केला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पिस्ता (Pista)
पिस्त्याचा वापर मिठाईमध्येही भरपूर केला जातो. पिस्त्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते. मूठभर पिस्त्यात 1.11 मिलीग्रामपर्यंत लोह असते. त्यामुळे रक्त वाढीसाठी तुम्ही नियमित पिस्ता खाऊ शकता.

अक्रोड (Walnut)
बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी अक्रोडाचा उपयोग होतो. याशिवाय हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्याचे काम अक्रोड करते. अक्रोड हे पोष्ठिक नट्स (Dry Fruits) आहे. मूठभर अक्रोडातून सुमारे 0.82 मिलीग्राम लोह मिळेल.

भुईमूग (Peanuts)
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अनेक पोषक तत्व असतात. मूठभर शेंगदाण्यांमध्ये 1.3 मिलीग्राम लोह असते. तुम्ही तुमच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश केला पाहिजे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अनेक पोषक तत्व असतात. हिवाळ्यातला ड्राय फ्रूट म्हणून शेंगदाणे खाऊ शकता.

पालक (Spinach)

पालक हे आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून समजले जाते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पालकचा रस नियमित प्यायल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याचा वेग बळावतो.

डाळिंब (Pomegranate)
रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात.

बीट (Beat)
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. आहारात सलाडपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करता येऊ शकतो. सकाळी नाश्ताला बीटाचा रस, पराठे यांचा समावेश केला जाऊ शकतो.

सफरचंद (Apple)
हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवण्याचा हमखास रामबाण उपाय म्हणजे सफरचंद. सफरचंदासोबत मध मिसळून खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

Padma Shri Award : नोकरी मिळाली नाही म्हणून शेती केली… आता पद्मश्री पुरस्काराने गौरव!

Anti Ageing Lifestyle : वयाच्या 40 नंतरही चिरतरूण दिसण्यासाठी तिशीनंतर या गोष्टींपासून दूर रहा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues