Take a fresh look at your lifestyle.

Health Tips : शिजवलेल्या तांदळाचे पाणी अनेक समस्यांवर गुणकारी, त्यासाठी हि माहिती नक्की वाचा

0

Health Tips : आपल्या सर्वाना माहिती आहे कि, जेवणात भाताचे महत्त्व अधिक असते तर तांदूळ शिजवून भात केला जातो. अनेकदा भात शिजल्यानंतर त्यातील पाणी आपण फेकून देतो. पण येथून पुढे असे करू नका. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचेही अनेक फायदेही आहेत. अनेक आजारांवर शिजवलेल्या तांदळाचे पाणी हे गुणकारी असल्याचे सिद्ध झालं आहे. हे पाणी केसांसाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानले जाते. तर आज आपण शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

तांदळाचं पाणी तापावर औषध म्हणून काम करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.

शिजवलेल्या तांदळाचं पाणी फायबरयुक्त असल्याने ते प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

केसांच्या समस्या असतील तर शिजवलेल्या तांदळाचे पाणी प्यावे. यामुळे समस्या कमी होण्यास मदत होते व केस चमकदार, मजबूत आणि घनदाट होतात.

शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये मीठ टाकून प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. तसेच रक्तदाबाच्या समस्या देखील दूर होतात.

तांदळाच्या पाण्यात फायबर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील छिद्र कमी होतात.

शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यात गूळ एकत्रित करून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

उन्हाळ्यात तांदळाचे पाणी पिल्यास डिहायड्रेशन होत नाही.

(टीप : हि बातमी सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कृषिदुत याची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन किंवा सल्ला जरूर घ्यावा)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues