Take a fresh look at your lifestyle.

बारा लिटर दूध देणारी शेळी पाहिली का?

0

अल्पभूधारक शेतकऱ्यांनासाठी वरदान ठरणारी शेळी आणून त्यावर संशोधन करुन क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी एका कार्यक्रमात व्य्क केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला ही शेळी कोणती? कुठली आहे? चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात…

दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर दिला जात आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन जात विकसीत असून ही शेळी दिवसाला तब्बल १२ लिटर दूध देते. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही शेळी म्हणजे एकप्रकारे वरदानच आहे.

● सानेन या जातीची शेळी गावठी शेळ्यांच्या तुलनेत अधिक दूध देते.
● २६० दिवसांत या जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते.
● शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे.
● या शेळीची चारा-पाण्याची गरज ही गाईच्या तुलनेत एक पंचमांश एवढी आहे.
● ही शेळी प्रकृतीने काटक असल्याने कोणत्याही हवामानात राहू शकते.
● या शेळीच्या रोगराईचे प्रमाण कमी असून ही शेळी खुराकाचे जास्तीत-जास्त दुधात रूपांतर करते.
● या शेळीचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा असतो.
● या शेळीपासून पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. यावेळी एका वेतात कधी दोन, तर कधी तीन करडे मिळतात. तीन वेतात पाच करडे मिळू शकतात.
● इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाणही अधिक आहे.
● या शेळीच्या जातीच्या बोकडाच्या मांसाची मागणी देखील अधिक आहे.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues