Take a fresh look at your lifestyle.

Tractor Subsidy : ट्रॅक्टर खरेदीसाठी आता 50 टक्के अनुदान; या सरकारने घेतला मोठा निर्णय

0

शेतकरी (farmer) सातत्यानं आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. देशातील विविध राज्यातील सरकारं देखील यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या दरम्यानच आता शेतकऱ्यांच्या हितासाठी हरियाणा सरकारनं (haryana government) देखील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 50 टक्के अनुदान (Tractor Subsidy) देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळं ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय होणार शेतकऱ्यांना फायदा :

अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कमी खर्चात शेती करण्यात येत आहे. याचाच विचार करुन हरियाणा सरकारनं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी पडवडणाऱ्या दरात शेतीसाठी लागणारी यंत्र सामुग्री खरेदी करु शकतात. जे शेतकरी आर्थिक अडचणींमुळं कधीही कृषी यंत्रे खरेदी करू शकत नव्हते, त्यांच्यासाठी हरियाणा सरकारनं घेतलेला निर्णय महत्वाचा आहे.

दरम्यान, 31 जानेवारीपर्यंत हरियाणा सरकार शेतकऱ्यांना 55 प्रकारच्या कृषी यंत्रांच्या खरेदीवर अनुदान देत आहे. यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्क्यांचे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues