Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायत निवडणुक : थोरातांची गावे विखेंनी जिंकली; घुलेवाडी, जोर्वे, तळेगावात बसला धक्का

0

ग्रामपंचायत निवडणुक : संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जन्म गाव असलेल्या जोर्वे गावासह तीन ग्रामपंचायतीतील सत्ता थोरात गटाला गमवावी लागली आहे. तर थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत विखे गटाला प्रतिधक्के दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुक : संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९, तर सोपान राऊत यांच्या गटाने घुलेवाडीत सरपंचपद मिळविले. जोर्वे हे आमदार थोरात यांचे गाव आहे. हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोडते. त्यामुळे या गावात विखे गटाचा हस्तक्षेप वाढला आहे. यातच राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतर या परिसरात विखे गटाची ताकद वाढली आहे. विखे गटाने जोर्वे व तळेगावमध्ये थोरात गटाचे वर्चस्व मोडित काढत सत्ता मिळविली.

ग्रामपंचायत निवडणुक : तर घुलेवाडीतील माजी सरपंच सोपान राऊत यांची सून निर्मला राऊत यांनी थोरात गटाचे प्राबल्य मोडित काढत सरपंचपद मिळविले आहे. संगमनेर तालुक्यातील थोरात गटाच्या ताब्यातील या तीन ग्रामपंचायतीतील सत्ता गेलेल्या आहेत. तर थोरात गटाने विखे गटाच्या ताब्यातील निमगाव जाळी व उंबरी बाळापूर सारख्या ग्रामपंचायतीतील सत्ता खेचून आणली आहे.

हेही वाचा : नेवासा तालुक्यात गडाखांचीच चलती! ग्रामपंचायत मतमोजणीत गडाख गटाचे वर्चस्व

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues