Take a fresh look at your lifestyle.

गाय-म्हैस पालन करण्याचा विचार करताय ? मग सरकारी अनुदान तुमची वाट पाहतंय!

1

शेतकरी बांधवांच्या फायद्याची सरकारी योजना आम्ही घेऊन आलो आहोत. या योजनेतून गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

काही नव्या तसेच जुन्या योजनांच्या एकत्रीकरणातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत शेतकरी बांधवांच्या वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यातील पहिली योजना म्हणजे गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे. चला तर योजनेचे स्वरूप काय? अर्ज कसा व कुठे करावा? याबाबत अधिक जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?
● दोन ते सहा गुरे : 77,188 रुपये (एक गोठा बांधकाम)
● सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत अनुदान
● 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान
● 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान

असा घ्या योजनेचा लाभ : यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल. त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.

● मग ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकून उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.

● अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा. जसे कि नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक.

● आपण ज्या कामासाठी अर्ज करणार आहात? त्यासमोर बरोबरची खूण करा.

● नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे? त्यासमोर बरोबरची खूण करा.

● तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा.

● मात्र जो प्रकार तुम्ही निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही सोबत जोडा.

● जर लाभार्थींच्या नावे जमीन असेल तर “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

● तुमचा रहिवासी दाखला जोडा. तसेच तुमचे काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का? तेही भरा.

● अर्जदाराच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची (18 वर्षांवरील पुरुष, स्त्री) संख्या लिहा.

● सर्वात शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा द्या.

● मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा देखील जोडा.

● ग्रामसभेचा एक ठराव देखील द्यावा लागेल. तसेच सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र देखील लागेल.

● वरील सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल. मग तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल.

● मनरेगाचे लाभार्थी असणाऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल; मात्र तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर मात्र त्यासाठी अर्ज करा आणि ते कार्ड मिळवा.

1 Comment
  1. रतन दादा कांबळे says

    मला गाय म्हैस.प्रकरन करायचे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues