Take a fresh look at your lifestyle.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांचा अपघात विमा मोफत; जाणून घ्या प्रोसेस

0

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सरकारद्वारे राबवली जाते. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अपघाती विमा मिळतो.

या योजनेचा लाभ पुढील घटकांना मिळतो :

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra महाराष्ट्रातील वैतीधारक जवळपास 153 लाख शेतकरी आहेत, त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. ज्यात मुलगा, आई, वडील, अविवाहित मुलगी नातेवाईकांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. विहिरीत पडून मृत्यू होणे, दोन हात, दोन पाय अपघातात निकामी होणे. अशा शेतकऱ्यांना दोन लाखांचा विमा मिळतो. त्याचबरोबरच शेतकऱ्यांचा एक डोळा, एक पाय अशाप्रकारे अपघात झाला असेल तर त्या शेतकऱ्यांना एक लाखांची मदत मिळते. त्याचबरोबर अपघात झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपयांची मदत मिळते.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे महत्वाची आहेत :
शेतकऱ्याच्या जमिनीचा ७/१२ (वहितीधारक नसेल तर कुटुंबातील सदस्याचा)
६क ची नकल
६ड (फेरफार ferfar )
एफ. आय. आर. ( FIR COPY )
पंचनामा
पोष्ट मार्टेम रिपोर्ट
व्हिसेरा रिपोर्ट
दोषारोप
दावा अर्ज
वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) वयाचा दाखला
तालुका कृषि अधिकार पत्र
अकस्मात मृत्यूची खबर
घटनास्थळ पंचनामा
इंनक्वेस्ट पंचनामा
वाहन चालविण्याचा वैध परवाना
अपंगत्वाचा दाखला व फोटो
औषधोपचारा चेकागदपत्र
अपघात नोंदणी 45 दिवसाचे आत करणे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.