Take a fresh look at your lifestyle.

‘ड्रॅगन फ्रूट’ शेती करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विभाग देणार अनुदान

0

‘ड्रॅगन फ्रूट’ ची वाढती मागणी पाहता ड्रॅगन फ्रूट’ला प्रथमच अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलाय. त्यानुसार हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेले शेतकरी ‘ड्रॅगन फ्रूट’ ची लागवड करतात. वर्षभरात काही अंशी हातात येणारे हे पीक तीन वर्षांनंतरपासून घसघशीत उत्पन्न देते. विविध आजारांमध्येही हे फळ आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे बोलले जाते.

पैठणचे शेतकरी श्याम काळे यांनी सांगितले की, यंदापासून हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याने शेतकरी या पिकाकडे वळतील. या पिकासाठी साधारणतः एकरी अडीच लाख रुपये लागवडीचा खर्च येतो. रोपे करूनही विकता येतात.

‘ड्रॅगन फ्रूट’ आरोग्यासंबंधीचे फायदे :
● ‘ड्रॅगन फ्रूट’मध्ये जीवनसत्त्व अ आणि ब व खनिजे, तसेच कॅल्शिअम अधिक प्रमाणात आढळतात.
● हे चेतासंस्थेसाठी लाभदायक असून डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे.
● डागरहित त्वचेसाठीही हितकारक असल्याचे सांगण्यात येते. जखमाही लवकर भरून येतात.
● हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे.
● पचनसंस्था सुधारणारे असून अधिक प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्टतेसारखा विकारही दूर करते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.