Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी! यंदा महाराष्ट्रात ‘असा’ येणार मान्सून (Monsoon in Maharashtra)

0

शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ (Drought) पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या 98% पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे.

यंदाचा मान्सून सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असेल. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्तरार्धाच्या तुलनेत चांगले पाऊसमान राहील. जूनमध्ये मॉन्सूनची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.