Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ दिवशी वरुणराजा बरसणार

0

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली आहे. श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्याने पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही डिव्हसी हवामान खात्याने यलो अलर्ट जरी केला आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता : १६ ऑगस्ट : गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर.

या भागांमध्ये यलो अलर्ट जारी : १७ ऑगस्ट :औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, आणि कोल्हापूर.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.