Take a fresh look at your lifestyle.

Gold Rate : बापरे..!! लवकरच सोने 60 पर्यंत महागण्याची शक्यता

0

सध्या सर्वत्र लग्नसराईच्या तयारी सुरु आहे. याच निमित्ताने तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नव्या वर्षात म्हणजे पुढील काही महिन्यातच सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 2023 या नववर्षात सोन्याचे दर GST धरून 57 हजारवर पोहोचले आहेत. तर GST सोडून हाच दर साधारण 56 हजारच्या जवळपास आहे.

तर दुसरीकडे पुढील काही महिन्यातच सोन्याचा भाव साधारण 60, 000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता सराफ तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कारण गेल्या 5 वर्षात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असून यावर्षात सोन्याचे दर वाढण्यामागे काय कारणं आहे हे जाणून घेऊया.

सोनेदर वाढीचे नेमके कारण काय?

कोरोना महामारीच्या कठीण काळामध्ये सोन्याचे दर हा 56 हजार पार गेले होते. मात्र हा रेकॉर्ड या वर्षी तोडला जाणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 5 जानेवारीपर्यंत सोन्याचे दर वाढतच होते. आज सोन्याचे दर खाली आले आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते सोन्याचे दर सध्या 2 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहेत. चांदीचा भावही अय सध्या 70 हजार रुपयांच्यावर आहे.

तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सतत बदलत आहे. कधी 81 तर कधी 83 रुपये असं मूल्य होत असल्याने त्याचा परिणाम सोन्यावर होत आहे. एवढंच नाही तर भारतातील आयात कर वाढवला आहे. त्यामुळे सोन्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे फेड पॉलिसी रेट हे देखील एक कारण असण्याचे सराफ तज्ज्ञ म्हणत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues