Take a fresh look at your lifestyle.

लसूणपासून ‘हे’ विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करा!

0

आपल्या स्वयंपाक घराला लसूण असल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. कारण यामध्ये अन्न पदार्थाची चव वाढवण्याबरोबर अनेक औषधी गुणधर्म आहेत. या उपयुक्त अशा लसणापासून प्रक्रिया करून अनेक प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. या लेखामध्ये आपण याबद्दल जाणून घेऊयात…!

लसूण सॉस : यासाठी सर्वप्रथम 100 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या, 250 मिली थंड दूध तसेच 500 मिली तेल आणि लिंबाचा चार चमचे रस व अर्धा चमचा मीठ घ्या. प्रथम लसूण पूर्णपणे सोलून घ्या व सोललेल्या लसणाच्या पाकळ्यामध्ये अर्धा चमचा मीठ व निम्मे दूध घालून हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या.

हे झाल्यानंतर उरलेले दूध त्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. हे तयार मिश्रण पुन्हा दोन मिनिटांसाठी मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. नंतर यामध्ये लिंबाचा रस टाका व तो चांगल्या प्रकारे मिसळून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या. अशाप्रकारे लसूण सॉस तयार होतो. हा सॉस व्यवस्थितपणे बरणीमध्ये हवाबंद करून ठेवा.

लसूण जेली : यासाठी 100 ग्रॅम सोललेला लसूण तसेच 500 मिली विनेगर एक किलो साखर तसेच 100 मिली पेक्टीन घ्या. जेली तयार करताना सर्वात अगोदर व्हिगर व लसूणच्या पाकळ्या एकत्र करा. त्यांना मऊ होईपर्यंत ब्लेंडरच्या सहाय्याने एकजीव करा. नंतर हे मिश्रण पॅनमध्ये काढून उरलेले व्हिनेगर व साखर एकत्र करून घ्या. या एकत्रित मिश्रणास मंद आचेवर उकळी द्या. हे मिश्रण उष्णता देताना ते करपणार नाही याची काळजी घ्या. या मिश्रणामध्ये पेक्टिन मिसळून पुन्हा उकळी द्या. अशाप्रकारे लसणाची जेली तयार होते. ही जेली निर्जंतुक बरण्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवा.

लसुन ( गार्लिक) सॉल्ट : यासाठी 20 ग्रॅम लसूण पावडर, 78 ग्रॅम बीट व कॅल्शियम स्टीअरेट दोन ग्रॅम घ्या. सर्वात अगोदर कॅल्शियम स्टीअरेट, लसूण पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या. वरील प्रमाण हे 100 ग्रॅम गार्लिक सॉल्ट बनवण्यासाठीचे आहे. या सॉल्टचा उपयोग पदार्थांना चव आणण्यासाठी होतो.

लसूण ज्यूस : यासाठी सर्वप्रथम वाळलेल्या लसणाच्या अंदाजे 4 मी आकाराच्या गोल चकत्या करून घ्या. या चकत्या मऊ होण्यासाठी गरम पाण्यामध्ये ठेवा. या मऊ लसूण चकत्यांचे बारीक तुकडे करा. त्याची पातळसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका सुती कापडामध्ये घेऊन चमच्याने दाबून लसूण ज्युस मिळवता येतो.

लसूण लोणचे : यासाठी 100 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम तेल, अर्धा चमचा हिंग, हळद आणि मेथी चे दाणे पावडर तसेच बडीशेप पावडर, व्हिनेगर 60 मिली व तिखट दोन चमचे घ्या. सर्वात अगोदर तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये एक चमचा हिंग घालून तो घातलेला हिंग फुलल्यानंतर त्यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या व एक चमचा मीठ घाला. या पाकळ्या चार ते पाच मिनिटांमध्ये मऊ होतात. त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये मेथी दाणे पावडर, बडीशेप पावडर व मोहरी पावडर घालून चांगले एकत्र एकजीव करून घ्या. त्यानंतर व्हिनेगर मिसळा. आता लसूणाचे लोणचे तयार आहे. हे लोणचे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues