Take a fresh look at your lifestyle.

ब्रॉयलर कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन करायचे आहे? मग वाचाच!

0

पोल्ट्री फार्म व्यवसाय म्हटलं कि, खाद्य व्यवस्थापनाला एक वेगळे महत्त्व असते. कारण कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक आहार अत्यंत गरजेचा असतो. दरम्यान त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावरही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यामध्ये खाद्य साठवणे आणि वेळ देणे असे दोन्ही घटक येतात. आज याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

पोल्ट्री शेड आणि खाद्य व्यवस्थापन :

● शेडमध्ये वेगळ्या खोलीत खाद्य पोते व औषधांची साठवण करा.
● तुमच्या खाद्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची काळजी घ्या.
● भिंतीपासून एक फूट लांब आणि जमिनीच्या वर एक फूट उंचीवर लाकडी फळ्यांची रॅक बनवून त्यावर 5,5 त्या लॉटमध्ये पोते ठेवा.
● खाद्य ठेवण्याची जागा कोरडी ठेवा.
● जास्त प्रमाणात खाद्य एकत्र ठेवल्यास उष्णता वाढून खाद्याची प्रतवारी खराब होते. हे देखील लक्षात ठेवा.
● आपण खाद्य ठेवलेले आहेत अशा ठिकाणी उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण ते खाद्याची नासाडी करतात.
● खाद्याचा अपव्यय होऊ नये यासाठी पन्नास पिल्लांसाठी एक फिडर असेल त्याप्रमाणे नियोजन करा. तसेच फिटर जवळ पिल्लांची गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या.
● खाद्याची भांडी प्रत्येक आठवड्याला स्वच्छ आणि साफ करून घ्या.
● खाली असलेल्या तूसावर खाद्य पडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या.
● सांडलेले खाद्य आणि त्यासह जर तूस पक्षांनी खाल्ले तर त्यामुळे आजार वाढतात. हे ध्यानात ठेवा.
● पिल्ले व मोठ्या कोंबड्या यांच्यासाठी प्रत्येकी 50 साठी एक ड्रिंकर असणे महत्वाचे आहे.
● शेडमध्ये खाली अंथरलेल्या तूसची व्यवस्थित काळजी घ्या. अन्यथा किल्ले व कोंबड्यांना काही आजार होतील.

तूसची काळजी कशी घ्यावी?

● शेडमध्ये खाली टरफले किंवा तूस धूळ बसलेली टाळा. कारण यामुळे पक्ष्यांना श्वसन दाह होऊ शकतो.
● प्रति एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या शेडमध्ये चारशे किलो तूर वापरा.
● उन्हाळ्यात तुसाचा थर हिवाळ्याच्या तुलनेत कमी असू द्या.
● हिवाळ्यात चार इंच तर उन्हाळ्यात दोन इंचाचा थर टाका.
● तुसामधील आद्रता 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली तर पिलांना जिवाणू व विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. दरम्यान मग तूस तातडीने बदला.
● तसामध्ये अमोनियाचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पक्षी आजारी पडून वजन वाढ रोखली जाते. हे टाळण्यासाठी एक हजार चौरस फुटांवर गरजेनुसार दहा ते 20 किलो सुपर फॉस्पेट फवारा.

————————————————-

शेतीविषयक माहिती, सरकारी योजना WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा : https://chat.whatsapp.com/FSF2Pba3KJPEWedTdJgpKa

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues