Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांनों जाणून घ्या…सकस चारा निर्मिती तंत्रज्ञान

0

1) सकस चारा निर्मितीसाठी दरवर्षी किंवा पीक काढणीनंतर जमिनीचे माती परीक्षण करणे खुप
महत्त्वाचे असते.
2) हिरव्या वैरणी आणि शिवाय दूध उत्पादन व गोठा टिकून राहत नाही त्यासाठी वर्षभर हिरव्या व
सकस चाऱ्याचे नियोजन असणे खूप गरजेचे असते.
3) सकस चारा निर्मिती ही जमिनीमध्ये असणाऱ्या पोषक व पूरक घटकावरती जास्त अवलंबून
असते.
4) जमिनीत पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली की निकृष्ट
दर्जाचा चारा उत्पादित होतो.
5) चारा टंचाईच्या काळात हायड्रोपोनिक्स पद्धतीने एक किलो मका बियाण्यांपासून आठ ते नऊ
किलो सकस चारा निर्मिती करता येतो.
6) हायड्रोपोनिक्स चाऱ्यामधून पोषणमूल्ये उदा- प्रथिने व शर्करा मुबलक प्रमाणात मिळतात तसेच
हा चारा पचनास अत्यंत हलका व 100 टक्के सेंद्रिय स्वरूपातील असतो.
7) अझोला खाऊ घातल्याने गाई व म्हशींच्या दूध उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ करता येते तसेच
पशुखाद्यवरील 20 ते 25 टक्के खर्च कमी होतो व एकूणच उत्पादनात वाढ होते.
8) अझोलामध्ये प्रथिने-25-30%, क्षार-10-15%, अमिनो आम्ले-7-16%, जीवनसत्वे, कॅल्शियम,
फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे व मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतात.

लाळ्या खुरकत बद्दल जाणून घ्या, (पायखुरी, तोंडखुरी, FMD) | कृषिदूत | प्रा. नितीन रा. पिसाळ

9) एकदल चारा निर्मितीसाठी मका, कडवळ, सुपर नेपीयर, डी.एच.एन-6,10 व्दिदल चारा पीकामधे
सकस चारा निर्मितीसाठी बरसीम, लसूणघास इत्यादींची लागवड करावी.
10) फुलोऱ्यात आलेला किंवा चिकात आलेला परिपक्व असा सकस चारा जनावरांना खायला
घातल्याने त्याचे अनेक फायदे होतात.
11) कमी वाढलेल्या व कमी कणसाच्या चाऱ्यामध्ये  पोषणतत्वे कमी प्रमाणात असतात त्यामुळे
आशा चाऱ्याचा जनावराच्या शारीरिक पोषणासाठी जास्तीचा फायदा होत नाही.
12) जास्त वाढलेला, निबर झालेला,कडक, कांडीयुक्त चाऱ्यामधील पोषणमूल्ये कमी झालेली असतात
अशा चाऱ्याचा जास्त उपयोग होत नाही.
13) बारमाही चारा पिके उदा- अँडव्हान्टा-756 आणि मेगा स्वीट ही अतिशय पौष्टिक व सकस चारा
पिके असून अधिक उत्पादनक्षम आहेत.
14) नवनवीन चारा पिकांच्या संशोधनानुसार त्या जातीच्या बियाण्यांची निवड करून उत्पादन
घेतल्यास नक्कीच चारा टंचाईवर मात करता येते.
15) कमी जागेत कमी वेळात जास्त चारा निर्माण केल्यास चारा टंचाई भासत नाही तसेच
एकसारखा व सकस चारा जनावरांना मिळाल्याने एकूणच दूध उत्पादन वाढते त्यामुळे पशुखाद्यावर
होणारा खर्च कमी करता येतो.
16) दुग्धव्यवसाय हा चाऱ्यावर होणाऱ्या अधिक खर्चामुळे परवडत नाही त्यामुळे पशुपालकांनी सकस

चारा निर्मिती केली तरच पशुखाद्यावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादनाची किंमत कमी होईल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

– नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues