Take a fresh look at your lifestyle.

Farmer Success Story : नाद खुळा! दूध व्यवसायातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..

0

Farmer Success Story शेतकरी हा खूप कष्टाने शेती करतो, त्याला नशिबाने आणि निसर्गाने साथ दिली तर तो सर्वांना भारी पडतो. असाच सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध व्यवसायातून मोठी प्रगती केली आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. त्यांनी चक्क एक कोटींचा बंगला बांधून त्यावर दुधाचा कॅन आणि गायीचा पुतळा उभारल्याने हे उद्योजक सध्या सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. सांगोला तालुक्यातील सावे इमडेवाडी या गावात प्रकाश इमडे याच कारणासाठी प्रसिद्ध आहेत. १९९२ सालापासून ते दुग्धव्यवसाय करत आहेत.

Farmer Success Story त्यांनी चार एकर शेतीत दोन एकरमध्ये मुक्त गोठा तयार केला आहे. तसेच दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. त्यांनी 1998 साली एका गाईवर या व्यवसायाला सुरुवात केला होता. या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना, आता एक महिन्यापूर्वीच पैसे होतील दुप्पट

 कामाची बातमी..!! शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार शेतीपूरक औषधे

Farmer Success Story त्यांनी कधीच गाई विकली नाही. यामुळे त्यांच्याकडे 150 गाई आहेत. त्यांच्या मुक्त गोठ्यात नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र तरी देखील ते यशस्वी झाले आहेत. प्रकाश इमडे Prakash Imade हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत.

Farmer Success Story इमडेनी उभारलेला हा व्यवसाय पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाशबापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करत असतात. बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढते.

Farmer Success Story गायीच्या शेणापासून प्रकाश इमडे यांना वर्षाकाठी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळते. हे शेणखत विकूनच त्यांनी स्वतःसाठी एक कोटींचा दिमाखदार बंगला उभारला आहे. त्यावर गायीची आणि दुधाच्या कॅनची प्रतिकृती उभारली आहे. मिळणाऱया उत्पन्नातून ते दरवर्षी शेतजमीन खरेदी करतात. प्रकाश इमडे आपल्या जनावरांना विकतचाच चारा पुरवतात. शेती करण्यापेक्षा, मजुरांचा खर्च आणि वाहनाचा खर्च करण्यापेक्षा त्यांना विकत घेतलेला चारा जास्त परवडतो. आजच्या तरुण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन करत अशा व्यवसायात जिद्दीने उतरावे असा सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues