Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शेतकऱ्याने नापीक जमिन केली सुपीक; वाचा यशोगाथा!

0

छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याने आपल्या अनोख्या प्रयोगातून ओसाड जमिनीवरही हिरवळ पिकवली आहे. संदीप लोहान असे या शेतकऱ्याचे नवा आहे. 12 वर्षांपूर्वी संदीप यांनी शेतीसाठी अशी जागा निवडली जेथील जमीन पूर्णपणे उग्र आणि नापीक होती. मग त्यांनी ही जमीन समतल करून शेती करण्याचा निर्णय घेतला.

लोहान यांचा जिद्दीचा आणि मेहनतीचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण त्यांनी 150 एकर खडबडीत जमीन शेतीसाठी निवडली. दरम्यान कृषी तज्ज्ञांसह अनेकांनी या जमीन निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि आज त्याच जमिनीवर 500 हून अधिक लोक राबत आहेत. विशेष म्हणजे त्यांची उत्पादने परदेशात पाठवली जात आहेत. संदीप आपल्या शेतातील टोमॅटो, हिरवी आणि शिमला मिरची देश -विदेशात पाठवून करोडो रुपये कमावत आहेत.

संदीप सांगतात की, त्यांच्या शेतात भाजीपाला व्यतिरिक्त 26 सफरचंद झाडे होती. यंदा 2021 मध्ये त्यांच्या एका झाडावर सुमारे 300-400 किलो फळे तयार झाली. फार्म हाऊसच्या खडकाळ जमिनीवर टोमॅटो 80-100 टन/एकर, शिमला मिरची 70 टन/एकर, हिरवी मिरची 40 टन/एकर, करडई 15 टन/एकर आणि करडई 40 टन/एकर तयार केली जाते. याशिवाय लिंबू, कोरफड सारखी झाडेदेखील त्यांच्या बागेत आहेत. त्यांच्या पॉली हाऊसच्या रोपवाटिकेत झाडे स्वतः तयार केली जातात. तसेच त्यांनी प्रयोग म्हणून खडकाळ जमिनीवर वांग्याची लागवड देखील करून पहिली.

आजघडीला संदीप विविहद ठिकाणांना भेट देऊन सरकारी आणि अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांकडे येतात, शेतीची तंत्रे जाणून घेतात तसेच सल्ला घेतात. संदीप यांना कमाईचा मोठा भाग बागायती पिकांमधून येतो. त्यांना विकून ते दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues