Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी बांधवांनो, मल्चिंग पेपर वापरताय? वाचा त्याचे उपयोग आणि फायदे

0

कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही.तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते,यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो.

मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फुल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपर च्या मदतीने घेता येतात.

भाजीपाला पिके :
मिरची, वांगी, फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो, भेंडी, वाटाणि, ढोबळी मिरची, काकडी, दोडका, कलिंगड
फळ पिके : पेरू, लिंब, किनोव, डाळिंब, केळी, सुपारी, आलुबुखार, जर्दाळू, पीच, संञा
धान्य पिके :
मका, तांदूळ
गळीत पिके : भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन
नगदी पिके : ऊस, कापूस
मसाला पिके : हळद, काळी मिरी, आले
फुल पिके :
झेंडू, जरबेरा, सोनचाफा, मोगरा, शेवंती, कार्नेशन, गुलाब, गुलछडी, ऑर्किड आणि इत्यादी.

Peepal Plant : अंगणात पिंपळाचे झाड वाढले तर काय करावे? या उपायांनी करा दोषमुक्ती


पिकांनुसार मल्चिंग पेपर कसा वापरावा?
गळीत धान्य :

भुईमूग- दोन ओळीतील अंतर-४ फूट
काकडी वर्गीय पिके :
काकडी – ५ ते ८ फूट बेड
कलिंगड – ८ फूट अंतरावर अथवा जाडओळ अंतरावर दोन बेड मधले अंतर १५ फूट.
खरबूज – ५ फूट सिंगल ओळ बेड, ८ फूट डबल ओळ बेड.

वेलवर्गीय पिके :

दोडका : ५ ते ७ फूट मांडव.


फळ भाजीपाला पिके :

भेंडी : ४ फुटांवर दोन ओळी बेड
वांगे : ५ फूट बेड
टोमॅटो : ८ फूट जोड ओळ लागवड
ढोबळी मिरची : ५ फूट जोडओळ
मिरची : ५ फूट जोडओळ

मल्चिंग पेपरचे फायदे :

बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते.
जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.
लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते.
पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते.
भुईमुगासारख्या पिकात मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढते.
सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते.
पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.

Agri Tech : तुम्हीही बनू शकता स्मार्ट शेतकरी, ‘या’ प्रगत तंत्रांनी शेतीमध्ये घडवा उज्ज्वल करिअर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues