Take a fresh look at your lifestyle.

फळबाग लागवड योजना : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 104 कोटी 50 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

0

फळबाग लागवड योजना : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन 2022-2023 मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. 104 कोटी 50 लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

भुमरे म्हणाले कि , ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ सुरु केली आहे. सन 2022-2023 च्या प्रथम नऊ माहीकरीता (डिसेंबर 2022 अखेर) आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्प‍ित निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या 60 टक्केच्या मर्यादेत वितरित केला जाईल’.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 100 कोटी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 4 कोटी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 50 लाख असे एकूण 104 कोटी 50 लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.

👉 माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे इंस्टाग्राम पेज लाईक करा : https://www.instagram.com/krushidoot_videos/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues