Take a fresh look at your lifestyle.

‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज!

0

शेतकऱ्यांना शेतात विजेसंदर्भांतल्या अडचणी कायमच भासतात. मात्र समस्येवर उपाय म्हणजे एक सरकारी योजना आहे. ती म्हणजे एक शेतकरी एक डीपी.. आज यासंबंधीच्या सर्व माहिती पाहूयात…
हे’ आहेत योजनेचे फायदे :
● २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति HP 7,००० रुपये द्यावे लागतील.
● अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,००० रुपये द्यावे लागतील.
आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, मोबाईल नंबर, शेताचे ७/१२ प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
● अर्जासाठी https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=Marathi या संकेतस्थळाला भेट द्या.
● आता तुमची भाषा निवडा
● त्यानंतर ‘कृषी’ या पर्यायावर क्लिक करा.
● आता ‘नवीन अर्जाची नोंदणी’ हा पर्याय निवडा
● त्यानंतर किती hp चा dp हवा आहे तो आकडा टाका. (3/5/7)
● पुढे ‘कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालील पैकी योजना निवडा” यामध्ये दोन पर्याय दिसतील.
१) पारंपरिक वीजपुरवठा २) सौर ऊर्जा. यापैकी ‘पारंपरिक वीजपुरवठा’ हा पर्याय निवडा.

बांधावर झाडे असावी का नसावी ? | बांधावर झाडे लावण्याचे फायदे | Krushidoot


● आता तुम्हाला अटी आणि शर्ती यामध्ये दिसतील. त्यामधला दुसऱ्या पर्याय म्हणजे ” पारंपारिक वीज जोडणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनातर्फे अथवा महसुली जमा रकमेनुसार उपलब्ध कृषी आकस्मिक निधीमधून होईपर्यंत मी प्रतीक्षा करेन प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार मला वीज जोडणी दिली जाईल हा पर्याय निवडा.
● आता ‘सबमिट’ या बटनवर क्लिक करा.
● त्यानंतर येणारा पर्याय वाचून ok बटनवर क्लिक करा.
● आता तुमहाला पुन्हा दोन पर्याय दिसतील 1) individual 2) organization यापैकी पहिल्या पर्याय निवडा.
● पुढील वैयक्तिक माहिती भरा.
● अर्जाच्या शेवटी Generate Otp वर क्लिक करा. त्यानंतर तुमही अर्जात टाकलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो आपल्या अर्जामध्ये भरा. त्यानंतर ok करा. या अर्जाची प्रिंट घेऊन तुमच्या जवळ ठेवा. तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर किंवा तुमच्या इमेल आयडीवर यासंदर्भात मेसेज येईल.
हेल्पलाईन नंबर : जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०, महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues