Take a fresh look at your lifestyle.

मत्स्यशेतीचा व्यवसाय करा’ महिन्याला लाखोंचे उत्पन्न कमवा!

0

शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याकाठी लाखो रुपये कमावू शकता. अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे मत्स्यशेती. या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखोंचे उत्पन्न कमावू शकता.

या’ आधुनिक तंत्रातून करा कमाई!

● मत्स्यपालनाचे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला भरपूर नफा देऊ शकते.
● अलीकडील काळात बायोफ्लोक तंत्र मत्स्यपालनासाठी खूप प्रसिद्ध होत आहे.
● बायोफ्लोक हे एका जीवाणूचे नाव असून यामध्ये मासे मोठ्या (सुमारे 10-15 हजार लिटर) टाक्यांमध्ये टाकले जातात.
● या टाक्यांमध्ये पाणी ओतणे, वितरीत करणे, त्यात ऑक्सिजन देणे इत्यादींची चांगली व्यवस्था आहे.
● बायोफ्लोक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेचे प्रथिनांमध्ये रूपांतर करतात, जे मासे परत खातात. त्यामुळे माशांच्या खाद्याच्या पैशात बचत होते.
● हे तंत्रज्ञान महाग असले तरी फायदाही अधिक मिळतो.
● राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळाच्या (NFDB) सल्ल्यानुसार 7 टाक्यांसह हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तरतुम्हाला सुमारे 7.5 लाख रुपये खर्च करावे लागतील.
● मासे मोठे झाल्यावर ते बाजारात विकून तुम्ही पैसे कमावू शकता. व्यवसाय मोठ्या पातळीवर गेला कि, तुम्ही महिन्याला 2 लाखांचे उत्पन्न कमवू शकता!

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.