Take a fresh look at your lifestyle.

Goat Diseases पावसाळ्यात शेळ्यांना ‘हे’ रोग होतात; अशी काळजी घ्या!

0

Goat Diseases आंत्रविषार : प्रादुर्भावातून उद्भवणारा जिवाणूजन्य आजार म्हणजे आंत्रविषार. विशेषतः मुसळधार पाऊस पडून गेला कि, ऊबदार वातावरणात हे जिवाणू मातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात. हा आजार प्रामुख्याने चांगल्या पोषित, पौष्टिक चार्‍यावर चरणार्‍या, मांसाने भरीव असणार्‍या मेंढ्यांना व शेळ्यांना होतो.

उपाय योजना : मेंढ्यांना शिफारशीत लस द्या. किमान तीन महिन्यांवरील वयोगटातील कोकरांना देखील लस टोचून घ्या. यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्या. मग रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागेल. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.

Goat Diseases फाशी : हा रोग हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस किंवा दुष्काळ परिस्थितीमुळे पसरत असतो. यात ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो, श्वास घेण्यास देखील त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.

उपाय योजना : अशावेळी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करून घ्या. मेलेल्या शेळ्या-मेंढ्यावर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्या. त्यांची कातडी विकू नये, शवचिकित्सा देखील टाळा.

Goat Diseases जरबा : अतिसूक्ष्म विषाणूंपासून हा आजार होतो. याचा प्रसार अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असेल कि, चिलटांची उत्पत्ती डबक्यात पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते.

लक्षणे : तोंडाच्या आतील भाग लालसर पडणे, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात. फुफ्फुसदाह होऊन मेंढ्या मरतात. यात मरतुकीचे प्रमाण 5 ते 20 टक्के आहे. यातून बर्‍या झालेल्या मेंढ्यांना अशक्त, कमकुवत कोकरे निपजतात, असे म्हटले जाते.

उपाय योजना : विशेषतः पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करा. यामुळे चिलटांचे प्रजनन कमी होऊन त्यांची संख्या वाढणार नाही. तसेच बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावी. कोमट पाण्यात मीठ टाकून मेंढ्यांचे तोंड धुवा.

Goat Diseases बुळकांडी : यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे आदी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाय योजना : नियमित पी.पी.आर. लस टोचून घ्या वाडग्यात स्वच्छता असू द्या वआजारी मेंढ्यांना वेगळे ठेवा.

पायलाग : बहुतेकदा शेळ्या-मेंढ्या या आजारास लवकर बळी पडतात. यास आर्द्र हवामान व ओलसर माती प्रसारास कारणीभूत ठरते. खुरे मऊ होणे, खुरांना सूज, दुर्गंधी, खुरांतून रक्त, खुरांत खपल्या, मेंढी लंगडणे, ताप, वजन कमी, खूर गळणे, खुरांत अळ्या पडणे, भूक नाहीशी होणे, अशक्तपणा येणे आदी या रोगाची लक्षणे आहेत.

● उपाय योजना : लसीकरण वेळापत्रक Goat Diseases
● रोग : महिना : मात्रा (शेळी, कातडीखाली)
● फुफ्फुस दाह : जानेवारी 2 मि.लि.
● घटसर्प : मार्च-सप्टेंबर 5 मि.लि.
● देवी : एप्रिल : कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली)
● आंत्रविषार : मे-नोव्हेंबर 5 मि.लि.
● बुळकांडी : मे-नोव्हेंबर 1 मि.लि.
● फर्‍या : जुलै 5 मि.लि.
● लाळ्याखुरकत : ऑगस्ट 5 मि.लि.

1) वाढलेली खुरे कापून योग्य निगा राखा.
2) दररोज लेंडी लोटून वाडग्याची स्वच्छता राखा.
3) पंधरा दिवसांतून एकदा वाडग्यात चुन्याचा सडा द्या.
4) मेंढ्यांना मूत्र व लेंड्या साठलेल्या जागी ठेवणे टाळा.
5) लंगडणार्‍या मेंढ्या कोरड्या जागेत इतर मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवा.
6) मेंढ्यांना दररोज दहा टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणातून चालत घेऊन जावे.
7) कायम लंगडणार्‍या मेंढ्या विकून टाका.
8) लंगडणार्‍या मेंढ्या विक्रीनंतर, तीन आठवड्यांनंतर नवीन मेंढ्या कळपात समाविष्ट करा.
9) खुरे पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवा.

Goat Diseases जंत : शेळ्यामध्ये तीन प्रकारचे जंत आढळतात. पट्टी कृमी, पर्णकृमी, गोलकृमी. यासाठी जनावरांना पुढीलप्रमाणे औषध द्या. जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी त्यांना अलबेंडाझाँल 5 मि. ग्रॅम प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्या. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होत असतो. अशावेळी शेळ्यांना पातळ संडास होते.

Goat Diseases शेळ्यांना इंजेक्शन द्या : अनेकदा शेळ्यांना होणार्‍या आजारावर इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे इंजेक्शन देता येत नसेल तर नाईलाज होतो. जर आपण स्वतःच शेळीला इंजेक्शन दिले तर शेळीचे प्राण वाचू शकतो. वारंवार सराव केला तर आपण सुद्धा शेळीला इंजेक्शन देऊ शकतो बरं. हे इंजेक्शन देता यावे म्हणून योग्य औषधांची माहिती आणि योग्य उपकरणांची माहिती असू द्या. हे इंजेक्शन देण्याआधी तुम्ही संत्री फळावर प्रयोग करू शकता.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Goat Diseases इंजेक्शन देतांना खालील काळजी घ्या :
1) एक्सपायरी डेट चेक करा.
2) इंजेक्शन एकदा वापरले की नष्ट करा.
3) एकाच सुईने एकाच शेळीला इंजेक्शन द्या.
4) इंजेक्शन देण्याआधी सर्व सूचना वाचून त्याचे पालन करा.
5) इंजेक्शनची मात्रा तपासूनच द्या.
6) इंजेक्शन शक्यतो उन पडण्याच्या आधी किंवा संध्याकाळी द्या.
7) इंजेक्शन दिल्यानंतर ती जागा चोळून घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues