Take a fresh look at your lifestyle.

Delhi Crime : धक्कादायक : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती! दिल्लीत पुन्हा एकदा गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये

0

दिल्लीतील श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला हत्याकांड आपल्या पैकी सर्वांनाच माहिती आहे. असाच आणखी एक प्रकार दिल्लीत घडला आहे. सततच्या लग्नाच्या तगाद्याला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने लिव्ह इन पार्टनरची हत्या केली त्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खूनानंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसह लग्नही केलं. प्रेयसीने लग्नाला विरोध केल्याने हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

दिल्लीमध्ये पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. निक्की यादव असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, साहिल गेहलोत (24) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुण साहिल गेहलोतला अटक केली आहे. साहिल हा मित्राव गावाचा रहिवाशी होता. तर, निक्की हरीयाणातील झज्जर येथील रहिवाशी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना साहिल आणि निक्कीची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर साहिल आणि निक्की हे दिल्लीतील द्वारका परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. साहिलने आपल्या प्रेमासंबंधी कुटुंबियांनी माहिती दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी साहिलचे दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न जमवलं होतं.

ही माहिती निक्कीला मिळाल्यानंतर तिने साहिलला काश्मीरी गेटजवळ भेटण्यासाठी बोलवलं. तेव्हा चर्चेवेळी दोघांत जोरदार वाद झाला. या वादातूनच साहिलने आपल्या कारमधील मोबाईल फोनच्या केबलच्या मदतीने निक्कीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर साहिलने तिचा मृतदेह मित्राव गावाच्या परिसरात असलेल्या एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. 9 आणि 10 च्या मध्यरात्री खून केल्यानंतर साहिल्याने 10 फेब्रुवारीला दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं. ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी साहिलला अटक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues